NCP Ajit Pawar on MNS :  राज्यात सध्या हिंदी आणि मराठी भाषांवरील वाद पेटलेला असतानाच हा वाद आता थेट चित्रपटगृहांमध्येही पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ‘सैयारा’ या प्रेमकथानकावर आधारित हिंदी चित्रपटाची सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकत असल्याने, त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलं आहे. विशेष म्हणजे, ‘सैयारा’मुळे थिएटरमालकांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या कमी केल्याने, आता मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये संघर्ष उभा राहत असल्याचे चित्र आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स मालकांना मराठी सिनेमांना योग्य स्क्रीन देण्याबाबत थेट इशारा दिला आहे. दरम्यान, मनसेच्या या भूमिकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून विरोध करण्यात आला असून, त्यांच्या पक्षाचे कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात एक अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? 

बाबासाहेब पाटील पत्रात लिहिताना म्हणाले, अमेय खोपकर मल्टिप्लेक्स वाल्यांना धमकी देणे बंद करा. चित्रपटाचा कंटेंट चांगला असेल तर नक्कीच प्रेक्षक आपल्या मराठी चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये आपल्याच मराठी चित्रपट असलेले बाई पण भारी देवा, झिम्मा, त्याचबरोबर आता थांबायचं नाही, गुलकंद, जारण यासारखे अनेक चित्रपट मल्टिप्लेक्स वाल्यांनी मोठ्या प्रमाणात शो दिलेले आहेत आणि स्क्रीन देखील वाढवून दिले आहेत. आपल्या येरे येरे पैसा या चित्रपटांमध्ये कुठलाही कंटेंट नसल्यामुळे तो येणाऱ्या प्रेक्षकांना रुचला नसावा तो प्रेक्षकांना आवडला नसावा म्हणून आपल्या मराठी प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरविले आहे.

पुढे बोलताना बाबासाहेब पाटील  म्हणाले, मी देखील अनेक मल्टिप्लेक्स मधून किंवा सिंगल थेटर मालकांकडून प्रत्येक चित्रपटाचा रोजचा डीसी रिपोर्ट हा घेत असतो, आपल्या देखील चित्रपटाचा डीसी रिपोर्ट पाहिल्यानंतर मला मल्टिप्लेक्स वाले यानी काही चुकीचा निर्णय घेतला आहे असं वाटत नाही. तुम्ही एक चांगले निर्माते आहात प्रेक्षकांना काय आवडतं काही नाही हे आपण नक्कीच जाणता. इथून पुढे आपण एखादा चांगला नवीन सिनेमा करण्याच्या वेळी कंटेंट वर जास्त भर द्यावा, जेणेकरून मल्टिप्लेक्स वाले किंवा सिंगल चित्रपटगृह तो सिनेमा लगेचच्या लगेच काढणार नाही याची काळजी निर्माता म्हणून आपण स्वतःच्या स्वतः घेतली पाहिजे. उगाच मल्टिप्लेक्स वाल्यांना धमक्या देऊन काही उपयोग नाहीये. मराठी चित्रपटाला प्रेक्षक नसेल, त्याला बुकिंग नसेल तर तिथे पर-डे वर काम करणाऱ्या लोकांचा देखील पगार निघत नसेल तर मालक म्हणून मल्टिप्लेक्स वाले का तो सिनेमा ठेवतील? हा देखील विचार आपण त्यांच्या जागी येऊन केला पाहिजे नुसती दमदाटी करून उपयोग नाही.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'माझा साखरपुडा झाला होता पण मोडला, मला मुलं हवी आहेत, पण त्यासाठी..' भाग्यश्री मोटेचं वक्तव्य