'माझा साखरपुडा झाला होता पण मोडला, मला मुलं हवी आहेत, पण त्यासाठी..' भाग्यश्री मोटेचं वक्तव्य
Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने वैवाहिक आयुष्याच्या प्लॅनिंगवर भाष्य केलंय.
Bhagyashree Mote
1/9
Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सिनेमा आणि मालिकांमधील आपल्या भूमिकांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
2/9
भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर देखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
3/9
दरम्यान, भाग्यश्री मोटे हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या वैवाहिक आयुष्याचं प्लॅनिंग कसं आहे? याबाबत भाष्य केलंय.
4/9
भाग्यश्री मोटे म्हणाली, बऱ्याच लोकांना हा समज आहे की, माझं लग्न झालं होतं. कारण ते सेलीब्रेशन ग्रँड करण्यात आलं होतं.
5/9
त्यावेळी पूजा होती, साडी नेसली होती. त्यामुळे लोकांना त्या लूकमुळे गैरसमज झाला.
6/9
मात्र, माझं लग्न झालेलं नाही. तो फक्त साखरपुडा होता. जो नंतर मोडला.
7/9
मी लग्नाचा विचार करणार आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे आणि मला मुलं हवी आहेत.
8/9
मला मुलं आवडतात. मला माझ्या बहिणीची मुलं आवडतात.
9/9
पण मला त्यासाठी योग्य पार्टनर हवा आहे. त्यानंतर मी त्याचा विचार करेन.
Published at : 26 Jul 2025 12:54 PM (IST)