मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात तब्बल 20 हजार 489 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 6 लाख 36 हजार 574 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.1 टक्के आहे. आज 10 हजार 801 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यभरात 312 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 45 लाख 56 हजार 707 नमुन्यांपैकी 8 लाख 83 हजार 862 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. राज्यात 14 लाख 81 हजार 909 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 196 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 312 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.97 टक्के एवढा आहे.


राज्यात 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम राबवणार : मुख्यमंत्री


आज नोंद झालेल्या एकूण 312 मृत्यूंपैकी 190 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 90 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 32 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 32 मृत्यू औरंगाबाद -5, कोल्हापूर -5, पुणे -5, ठाणे -4, चंद्रपूर -2, रायगड -2, जालना -2, अहमदनगर -1, जळगाव -1, मुंबई -1, नाशिक -1, परभणी -1, रत्नागिरी -1 आणि पालघर -1 असे आहेत.


पुणे विभागाच कोरोनाचा उद्रेक


मुंबई शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यात यश मिळत असेल तरी राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. विशेषकरुन पुणे विभागात याचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुणे विभागात आज सगळ्यात जास्त सहा हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई-ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकताना दिसत आहे.


Ajit Pawar on Pune Lockdown | पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला,अजित पवारांचा खुलासा