Nawazuddin Siddiqui Daughter Shora: बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांचा नवा चित्रपट 'कोस्टाओ'मुळे (Costao Screening) चर्चेत आहे. हा चित्रपट 1 मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला, जिथे चित्रपटाची स्टारकास्ट आणि त्याचे निर्माते दिसले. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची मुलगी शोरा सिद्दीकीसोबत (Shora Siddiqui) 'कोस्टाओ'च्या स्क्रीनिंगला पोहोचला. आता, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान नवाजचा त्याच्या मुलीसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शोरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शोरा काळ्या ड्रेसमध्ये आली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल होताना पाहून लोक तिची तुलना ऐन तारुण्यातील ऐश्वर्या रायच्या लूकशी करत आहेत.
हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसते नवाबची मुलगी
काही लोकांचं म्हणणं आहे की, शोराला पाहून असं वाटतंय की, महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आली आहे. शोराकडे पाहिलं तर तिचे वडील नवाजुद्दीनं सिद्दिकींची एक झलक पाहायला मिळते. शोराला पाहिल्यानंतर अनेकांनी ती ऐश्वर्या रायसारखी दिसते, असं म्हटलं आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, शोरा तरुणपणातील ऐश्वर्या रायसारखी दिसते. ऐश्वर्यानं ज्यावेळी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, त्यावेळी ती अशी दिसायची असं अनेकांचं म्हणणं आहे. तर, अनेकांना असं वाटतंय की, शोरा व्हायरल गर्ल मोनालिसासारखी दिसते. शोरानं आता तिच्या लूकनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवाजच्या मुलीला पाहून नेटकरी काय म्हणाले?
'कोस्टाओ'च्या स्क्रीनिंगला शोरा तिचे वडील नवाजुद्दीन सिद्दीकींसोबत आलेली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरनं लिहिलंय की, "ती सुंदर दिसतेय, पण, ऐश्वर्यासारखी दिसत नाहीये...", आणखी एका युजरनं लिहिलंय की, "शोरा खूप सुंदर आहे आणि ती एक अभिनेत्री बनण्याच्या लायक आहे...", तिसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "ही तर मोनालिसासारखी दिसतेय, पण सुंदर आहे." चौथ्या युजरनं लिहिलंय की, "ही खूपच प्रेमळ आहे, हिला तर फिल्ममध्ये घेतलं पाहिजे." शोरा आणि तिचं सौंदर्य पाहून लोक आता अशा अनेक कमेंट्स करत आहेत. दरम्यान, शोरा अजूनही शिकतेय. पण, नवाजचे फॅन्स शोराच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :