SSC HSC Exam Result 2025: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील दहावी (SSC Result 2025) आणि बारावीचा (HSC Result 2025) निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांसह पालकांना देखील उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील दहावी अन् बारावीचा निकालाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. आता दहावी आणि बारावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून येत्या 15 मे पर्यंत दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे. 5 ते 10 जून दरम्यान दहावीचा निकाल, तर 15 मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. (SSC HSC Exam Result Date 2025)

मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही-

राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स-

mahresult.nic.inmahahsscboard.inhscresult.mkcl.org 

दहावीच्या परीक्षेत 89 गैर प्रकारांची नोंद 

दरम्यान, राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते . राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा प्रशासनाकडून ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रांची निगराणी, परीक्षा केंद्रांबाहेर दृक् श्राव्य चित्रीकरण, सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठ्या पथकांची नियुक्ती, परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची ‘चेहरा पडताळणी व्यवस्थे’द्वारे (फेस रेगक्निशन) तपासणी, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, अशा विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, गैरप्रकार घडणाऱ्या शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89, तर बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.

राज्यासह देशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

CBSE Pattern : महाराष्ट्राचा CBSE पॅटर्न कसा असणार? अभ्यासक्रम आणि पुस्तके कशी? नव्या शालेय शिक्षणाबद्दल A To Z माहिती


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI