Marathi Movie Box Office Collection :  मागील दोन आठवड्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर (Box Office) दोन मराठी सिनेमांनी टक्कर दिली. सप्टेंबर महिन्यांत लगोपाठ दोन मराठी सिनेमांचं प्रदर्शन करण्यात आलं. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे सिक्वेल असून कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. जवळपास 19 वर्षांनी 'नवरा माझा नवासाचा-2' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. 20 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी 'धर्मवीर -2' (Dharmaveer 2) हा सिनेमा रिलीज करण्यात आला. 


दरम्यान यंदाच्या वर्षात सर्वाधिक ओपिनिंग करणारा धर्मवीर-2 हा यंदाच्या वर्षातला पहिला मराठी सिनेमा ठरला. त्यामुळे या सिनेमाने नवरा माझा नवासाचा-2 या सिनेमाला मागे टाकलं. इतकंच नव्हे तर तब्बल चारच दिवसांत या सिनेमाने चारच दिवसांत 9.27 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे सध्या धर्मवीर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट कलेक्शन करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच नवरा माझा नवसाचा-2 या सिनेमाने 11 दिवसांत 16.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


'नवरा माझा नवसाचा -2' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन


सॅनसिल्कच्या अहवालानुसार, नवरा माझा नवसाचा -2 या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.85 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.75 कोटी, चौथ्या दिवशी 1.2 कोटी, पाचव्या दिवशी 1.1 कोटी, सहाव्या दिवशी 95 लाख, सातव्या दिवशी 90 लाख, आठव्या दिवशी 55 लाख, नवव्या दिवशी 1.5 कोटी, दहाव्या दिवशी 1.75 कोटी आणि अकराव्या दिवशी 37 लाख इतकी कमाई केली. त्यामुळे अकरा दिवसांत या सिनेमाने एकूण 16 कोटी 42 लाख रुपयांची कमाई केली आहे. 


धर्मवीर-2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन


सॅनसिल्कच्या अहवालानुसार, धर्मवीर -2 या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.92 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 2.35 कोटी,  2.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चार दिवसांत या सिनेमाने जवळपास 9.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे.       


या दोन्ही सिनेमांमुळे सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची टक्कर पाहायला मिळतेय. त्यातच धर्मवीर सिनेमातील राजकीय नाट्यघडामोडी आणि गणपतीपुळेचा प्रवास या दोन्हींपैकी प्रेक्षकांना काय भावतंय, हे चित्र बॉक्स ऑफिसच्या कमाईवरुन स्पष्ट होतंय. 


ही बातमी वाचा : 


Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पाहुण्यांची मांदियाळी; सुबोध भावे, आदिनाथ कोठारे सूरजसोबत 'झापुक झुपुक' करणार