The Confession : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) चाहता वर्ग मोठा आहे. गेली काही वर्ष ते मोठ्या पडद्यापासून दूर होते. ते पुन्हा मोठ्या पुनरागमन कधी करणार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. लवकरच नानांचा 'द कन्फेशन' (The Confession) नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून नाना हे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे.
मोशन पोस्ट रिलीज
तरण आदर्शनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'द कन्फेशन' चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. या मोशन पोस्टमध्ये नाना पाटेकर यांचा आवाज ऐकू येत आहे. मोशन पोस्टमध्ये 'सच का चेहरा देख लिया मैंने...' असा डायलॉग ऐकू येतो. 'द कन्फेशन' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले आहेत.
नरेंद्र हीरावत, प्रवीण शाह, सगुन बाघ, अजय कपूर आणि सुभाष काळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील नाना पाटेकर यांचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!