Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या एका सिनेमाच्या शूटींगसाठी शिमला (Shimla) येथे आहेत. नाना पाटेकरांनी शुक्रवारी (दि.26) मशोबरा येथील 173 वर्षे जुन्या राष्ट्रपती निवासमध्ये जाऊन जवानांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी पाटेकर (Nana Patekar) यांनी तिरंगाही फडकावला. अभिनेते राजपाल यादव, सिमरत कौर आणि उत्कर्ष शर्मा सिनेमाच्या शूटींगसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिमल्यात आहेत. राजधानी मालरोड येथे शनिवारी (दि.26) पुन्हा एकदा बॉलिवूडच्या एक सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे. मालरोड, गेयटी थेअटर, स्केंडल पॉईंट या परिसरात सिनेमाची शूटींग केली जाणार आहे. या सिनेमात राजपाल यादव, सिमरत कौर आणि उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकरही अभिनय करताना दिसणार आहेत.
शूटींगसाठी नाना पाटेकर शिमल्यात
यापूर्वी 17 ते 20 जानेवारी दरम्यान मालरोड येथे सिनेमाची शूटींग झाली होती. येथील बँटनी कैसल, सीटीओ चौक, स्केंडल पॉईंट आणि मालरोड या ठिकाणी सिनेमाचे शूट घेण्यात आले होते. यावेळी शिमला येथील डोंगराळ भागातील संस्कृती देखील कॅमेरात कैद करण्यात आली होती. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी स्थानिक लोकांनाही सिनेमात काम करण्याची संधी दिली. शिमला येथील डोंगराळ भागातील पेहराव केलेल्या लोकांनी सिनेमात अभिनय केला. त्यानंतर 21 जानेवारीलाही सिनेमाची शूटींग पार पडली होती. मशोबरा येथे गुरुवारी कलाकारांनी अभिनय देखील केला होता.
अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar), सिमरत कौर, उत्कर्ष शर्मा 13 जानेवारी रोजी शिमला येथे दाखल झाले होते. तर अभिनेता राजपाल यादव 14 जानेवारीला शिमल्यात पोहोचले. शूटींगचे व्यवस्थापन पाहणारे विकास बहल म्हणाले की, 27 ते 30 जानेवारी दरम्यान मालरोड येथे सिनेमाची पुढील शूटींग पार पडेल. त्यानंतर मशोबरा येथे उर्वरित सिनेमाची शूटींग होईल. पुढे बोलताना ते म्हणाले, 22 फेब्रुवारी पर्यंत हिल्सक्वीन येथील काही भागात शूटींगसाठी असतील. सध्या सर्व कलाकार मशोबरा येथील एका हॉटेलात थांबले आहेत.
अक्षय कुमारनेही साजरा केला प्रजासत्ताक दिन
अभिनेता अक्षय कुमार यानेही प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. त्याने समुद्रकिनारी टायगर श्रॉफ समवेत आजचा दिवस सेलिब्रेट केला. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात वंदे मातरम या गाण्यावर धावताना दिसत आहे. यावेळी टायगरही त्याच्या सोबत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या