Nagraj Manjule ON Sairat : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'सैराट' (Sairat) या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासोबत या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. सिनेमातील आर्ची आणि परश्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसरने (Akash Thosar) मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. पण 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. 


नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतत आहे. या सिनेमात आकाश ठोसर आणि सायली पाटील (Sayali Patil) ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सायली पाटीलने 'सैराट' सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी तिचा विचारणा झाली असल्याबद्दल भाष्य केलं आहे. 


आर्चीच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती : सायली पाटील


सायली पाटील म्हणाली,"अभिनेत्री होण्याची माझी इच्छा नव्हती. पण अपघाताने या क्षेत्रात आले आहे. कॉलेजमध्ये असताना 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती. नागराज सरांनी मला मी फायनल झाल्याचं सांगितलंदेखील होतं. पण त्यावेळी सिनेमा करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी नागराज सरांची ऑफर नाकारली. हा सिनेमा मी नाकारला आणि रिंकू राजगुरूची लोकप्रियता वाढली याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. आता पुन्हा एकदा 'घर बंदूक बिरयानी'च्या माध्यमातून मी नागराज मुंजळे आणि आकाश ठोसरसोबत काम करत आहे". 






बॉक्स ऑफिसवर 'सैराट'चं वर्चस्व


'सैराट' या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रातोरात सुपरस्टार झाले. सिनेमाचं कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, डायलॉग, गाणी सर्वकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं. अनेकांनी पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहिला. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'सैराट'चा बोलबाला पाहायला मिळाला. 


नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज


नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा येत्या 7 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नाजराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. 'आशेच्या भांगेची नशा भारी', अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ghar Banduk Biryani Trailer: नागराज, सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर आकाश आणि सायलीचा रोमँटिक अंदाज;  'घर बंदूक बिरयानी' चा ट्रेलर पाहिलात?