Naga Chaitanya : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार नागा चैतन्‍य (Naga Chaitanya) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागा चैतन्‍य आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामधील नागा चैतन्यचा लूक देखील रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये नागा ही आमिरच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. बालाराजू असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. अनेक वेळा नागा चैतन्यची तुलना त्याच्या वडीलांसोबत म्हणजेच नागार्जुन यांच्यासोबत केली जाते. याबाबत एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्यनं सांगितलं.


अनेक वेळा नागा चैतन्यची तुलना नागार्जुन यांच्यासोबत केली जाते. याबाबत एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्यनं सांगितलं, 'माझ्या वडिलांना पाहूनच मी मोठा झालो. माझ्या वडिलांसोबत माझी तुलना केली जाते, या गोष्टीकडे मी  सकारात्‍मक दृष्टीनं पाहतो. ' 


सांगितला मजेशीर किस्सा 
मुलाखतीमध्ये नागा चैतन्यनं एका मजेशीर किस्सा देखील सांगितला. तो म्हणाला, 'जेव्हा मी आणि माझे वडील एकत्र असतो तेव्हा जर एखादी महिला जर आमच्यासोबत फोटो काढायला येतो तेव्हा मला सुरुवातीलाच कळत की त्या महिलेला कोणासोबत फोटो काढायचा आहे. अनेक महिला नागार्जुन यांच्यासोबतच फोटो काढतात.  '
 
लाला सिंह चड्ढा या चित्रपटाबद्दल नागा चैतन्यनं सांगितलं की, या चित्रपटामध्ये आमिर खानच्या ऐवजी दुसरा कोणी असलं असतं तर त्यानं या चित्रपटामध्ये काम केलं नसतं.  ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट  11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. तर नागार्जुन यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा: