Naga Chaitanya On Divorce With Samantha Prabhu: अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) एकमेकांपासून वेगळं होऊन 4 वर्ष झाली आहेत, पण यामागील कारण 200 कोटी रुपयांची मोठी पोटगी असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. पण आता आम्ही तुम्हाला सांगतो की, सततच्या अफवांना दूर सारत, नागा चैतन्यच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की, समांथा रूथ प्रभूपासून वेगळं होण्यात 200 कोटी रुपयांच्या पोटगीचा दावा पूर्णपणे निराधार होता. वेगळं होण्याचा निर्णय दोघांनीही आपसी सहमतीनं घेतला होता.
नागा चैतन्यकडून घटस्फोटाच्या अफवांवर वक्तव्य
साऊथ स्टार नागा चैतन्यनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती असलेल्या सर्व चर्चा आणि अफवा मागे टाकल्या आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना नागा चैतन्यनं समांथासोबतच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं. तो म्हणाला की, "आम्हाला आमचे वेगवेगळे मार्ग हवे होते. आमच्या वैयक्तिक कारणांमुळे, आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या पद्धतीनं पुढे जात आहोत."
समांथा रूथ प्रभूनंही नागा चैतन्यच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. कॉफी विथ करण या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिनं घटस्फोटाबाबतच्या सर्व अफवांना उत्तर दिलं. ती म्हणाली की, "मी 200 कोटी रुपयांची पोटगी घेतली आहे. दररोज सकाळी मी आयकर अधिकाऱ्यांकडून काहीही नसल्याचं दाखवण्याची वाट पाहत असे. प्रथम त्यांनी पोटगीबद्दल एक कथा रचली. नंतर त्यांना लक्षात आले की ती विश्वासार्ह कथा वाटत नाही. नंतर त्यांनी सांगितले की ही प्री-नप आहे, म्हणून ती पोटगी मागू शकत नाही." त्यानंतर तिने स्पष्ट केले की, "सत्य हे आहे की मी कोणाकडूनही एक पैसाही घेतलेला नाही."
मी कोणाकडूनही एक पैसाही घेतलेला नाही : समांथा प्रभू
समांथानं कॉफी विथ करण मध्ये बोलताना तिच्याबाबतच्या विचित्र अफवांना थेट उत्तर दिलं, ती म्हणाली की, "मी 200 कोटी रुपये पोटगी म्हणून घेतले आहेत. दररोज सकाळी मी आयकर अधिकाऱ्यांना असं काहीही नसल्याचं सांगण्याची वाट पाहत असते. सर्वात आधी त्यांनी पोटगीबद्दल एक स्टोरी रचली. नंतर त्यांना लक्षात आलं की, त्यांनी रचलेली स्टोरी विश्वासार्ह्य वाटत नाही. नंतर त्यांनी सांगितलं की, ही प्री-नॅप आहे, म्हणून ती पोटगी मागू शकत नाही." हे सांगताना समांथानं स्पष्ट केलं की, "सत्य हे आहे की, मी कोणाकडूनही एक पैसाही घेतलेला नाही..."
नागा चैतन्य आणि समांथा यांच्या जवळच्या एका मैत्रिणीनं वेगळं होण्याची पुष्टी केली आणि म्हटलं की, "जेव्हा दोन लोक परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतात, विशेषतः इतक्या आदरानं, तेव्हा पोटगीची संकल्पना काम करत नाही. ती आर्थिक मागण्यांबद्दल नाही तर सौहार्दपूर्णपणे पुढे जाण्याबद्दल आहे."
नागा चैतन्य आणि समांथानं घटस्फोट घेतला असून दोघेही आता आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. घटस्फोटानंतर समांथानं 2019 मध्ये दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत काम सुरू केलं. तर दुसरीकडे नागा चैतन्यनं घटस्फोटानंतर नव्या जोडीदाराचा शोध सुरू केला. 2022 मध्ये नागा चैतन्य शोभिता धुलिपालाला अमेझॉनच्या एका कार्यक्रमात भेटला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि अखेर त्या मैत्रीचं लग्नात रुपांतर झालं.
दरम्यान, आज नागा चैतन्य आणि समांथा दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून दोघेही यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. सध्या दोघांबाबत अनावश्यक अफवा सुरू आहेत. नागा चैतन्य त्याच्या विवाहित आयुष्यात खूप आनंदी आहे. तर समांथा सुपरस्टार बनली आहे. नागा चैतन्यची सातत्यानं वाढणारी लोकप्रियता दर्शवते की, तो आता भूतकाळ मागे सोडून त्याचं संपूर्ण लक्ष त्याचं करिअर आणि कुटुंबावर केंद्रीत करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :