Oscars 2024 Naatu Naatu Song : आज ऑस्करचा पुरस्कार सोहळा शानदारपणे पार पडला. यंदाच्या ऑस्कर सोहळा ओपनहायमरने गाजवला. ओपनहायमरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता या श्रेणीतील पुरस्कारासह सात पुरस्कार मिळाले. तर,  पुअर थिंग्स या चित्रपटाने चार पुरस्कार मिळाले. या सगळ्या पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू'ची जादू चालली.  


मागील वर्षी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आरआरआर चित्रपटाला स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले. त्यानिमित्ताने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचा पुन्हा एकदा कॅमिओ झाला. 


'नाटू नाटू'चे गाणं पुन्हा का वाजलं?


ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट साँगच्या प्रेझेंटेशन दरम्यान आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याची झलक दाखवण्यात आली. 96 व्या ऑस्करसाठी जगभरातील काही उत्कृष्ट स्टंट दृश्यांचा समावेश असलेली क्लिप तयार करण्यात आली होती. या क्लिपमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका असलेल्या पीरियड अॅक्शन फिल्म  आरआरआरच्या गाण्याची झलक दाखवण्यात आली. 2023 मध्ये, 'RRR' मधील 'नाटू-नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल स्कोअर या कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात या क्लिपद्वारे  स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले. 






 










बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई


एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. भारतात या चित्रपटाने 767.54 कोटींची कमाई केली. तर, तर वर्ल्डवाईड 1106 कोटींची कमाई केली होती.