Munna Bhai MBBS Supporting actor Khurshed Lawyer : दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. जादू झप्पी पासून ते संजय दत्तच्या स्टाईलवर आज देखील सोशल मीडियावर मीम्स बनलेले पाहायला मिळतात. दरम्यान, आता या सिनेमात स्वामी म्हणजेच अभिनेता  Khurshed Lawyer याने या सिनेमातील रॅगिंगच्या सीनबाबत एक किस्सा सांगितलाय. 

Khurshed Lawyer म्हणाला, मी सीन शूट करण्यासाठी गेलो. तेव्हा मला मला म्हणाले, चल स्वामी आम्ही तुम्हाला डान्स स्टेप्स दाखवतो. मी विचारलं कोणता डान्स? ते म्हणाले डोलारे डोला.. चड्डीवर यायचं आहे. चड्डीवरच डान्स करायचा आहे. मला त्यांनी सांगितल्यानंतर मी लाजत होतो. मी त्या सीनसाठी तयार नव्हतो. मात्र, काहींनी नंतर सांगितलं की, याच्या रॅगिंगचा सीन नाही. काही वेळेस मनात यायचं की, एकदा करावं.. त्यानंतर अंडरवेअरचा सीन होता...जसा बाबा (संजय दत्त) म्हणायचं अंडरवेअर छोडके सब तेरा...तसं मला फास हसू यायचं आणि रिटेक करावा लागायचा.  

'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 22 वर्ष झाले आहेत. हा सिनेमा 2003 साली प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. कॉमेडी आणि सामाजिक संदेश यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, अरशद वारसी, बोमन इरानी आणि ग्रेसी सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सिनेमाची स्टोरी काय होती?

मुरलीप्रसाद शर्मा (मुन्ना) हा एक छोटासा गुंड असतो. त्याचे वडील हरिओम शर्मा आणि आई त्याला डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहतात. पण मुन्ना डॉक्टर नसतोच, तो फसवणूक करून स्वतःला डॉक्टर दाखवतो. जेव्हा त्याच्या आई-वडिलांना हे सत्य कळतं, तेव्हा ते फार दुखावले जातात. त्यानंतर मुन्ना खऱ्या अर्थाने डॉक्टर होण्याचा निर्धार करतो. तो मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि तेथील रूढीवादी शिक्षणपद्धतीला आणि कठोर डीन डॉ. अस्तानाला एक प्रकारे आव्हान देतो.

'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.' या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला जातो की, वैद्यकीय शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे, तर रुग्णांशी माणुसकीने वागणं, प्रेमाने संवाद साधणं हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. "जादू की झप्पी" हे एक प्रतीक बनून उभे राहते, जे माणुसकी, प्रेम आणि समजूतदारपणाचे प्रतिक आहे.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून गेला. यातील संवाद, पात्रं आणि प्रसंग आजही लोकांच्या लक्षात राहतात. 'सर्किट' आणि 'मुन्ना' ही जोडगोळी विशेष गाजली. या सिनेमाने राजकुमार हिरानी यांना एक मोठा दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.' हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो एक सामाजिक भाष्य करणारा चित्रपट आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सौंदर्याची परिभाषा बदलली, दूरदर्शनवर बातमी वाचणाऱ्या स्मिता पाटील बॉलिवूडच्या सुपरस्टार कशा बनल्या?

हॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, सौंदर्य पाहून अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्षही झाले होते फिदा; पाहा फोटो