Mumbai Drugs Case Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्जप्रकरणी 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनसह तीव जणांच्या जणांना आणखी तीन दिवस एनसीबीच्या कोठडीत काढवे लागणार आहेत. आर्यन खानच्या मोबाईल चॅटवरुन अनेक पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती एनसीबीने किला कोर्टात दिलीय. आर्यन आणि इतर आरोपींमधलं व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाकडे सादर करण्यात आलंय. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक कोडवर्ड वापरल्याचा एनसीबीनं कोर्टात दावा केला आहे.


कोर्टात नेमकं काय झालं?



  • एनसीबीच्या अटकेतील एका सप्लायरच्या तपासासाठी आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी

  • एनसीबीकडून कोडवर्ड  असलेले काही चॅट कोर्टात सादर, त्याच्या चौकशीसाठी आर्यनच्या कोठडीची एनसीबीची मागणी

  • आर्यन व्हॉट्सअॅपवर ड्रग पेडलर्ससोबत कोड-वर्डमध्ये चॅट करत होता. त्यातून समोर आलेल्या काही बाबींचा तपास आवश्यक- एनसीबी

  •  आर्यनच्या चॅटमधून त्यानं ड्रग्जसाठी रोख रक्कम देत व्यवहार केल्याचं समोर, म्हणून कोठडी मिळावी - एनसीबी

  • आर्यनने परदेशात असतानाही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे, त्याच्या चौकशीसाठी आर्यनची कोठडी आवश्यक, एनसीबी वकिलांचा दावा

  •  पार्टीच्या आयोजकांनी  आर्यनला कॉम्प्लिमेंटरी पास का दिले, याची चौकशी करणे गरजेचे - समीर वानखेडे

  • आर्यनकडे तिकीट, बोर्डिंग पास नव्हता. आयोजकांसोबत त्याचं संभाषण नाही, आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही, मग अटक का?- सतीश मानेशिंदे

  •  व्हॉट्सअॅप चॅट म्हणजे ड्रग्ज सापडणं असं नाही, आर्यनकडे ड्रग्ज सापडलेले  नाहीत, आर्यनचे वकील मानेशिंदेंचा दावा

  • ड्रग्ज सापडले नसतील तर आर्यन खानला अटक करणे योग्य नाही, सतीश मानेशिंदेंचा कोर्टात दावा

  • वकिलांचे दावे-प्रतिदावे ऐकल्यानंतर न्यायालयाची आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी, आर्यनचा मुक्काम तुरुंगातच


एनसीबीच्या छाप्यात कोणत्या आरोपीकडे किती ड्रग्ज सापडले?  


एनसीबीच्या छाप्यात कोणत्या आरोपीकडे किती ड्रग्ज सापडले? या संदर्भातील माहिती समीर वानखेडे यांनी कोर्टात सादर केली. ती खालीलप्रमाणे



  •  अरबाज मर्चंट - 6 ग्रॅम चरस

  • मुनमुन धमेचा - 5 ग्रॅम चरस

  • विक्रांत चोकर - 5 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज, 10 ग्रॅम कोकेन

  • मोहक जयस्वालनं नुपरला  एमडीएमएच्या चार गोळ्या पुरवल्या


 



काय आहे प्रकरण?


 मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना 7 ऑक्टोबरपर्यंत  NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. 


एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.