Mrunmayee Deshpande On Parenthood: टेलिव्हिजनवरुन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि नंतर थेट सिनेमांमधून अगदी घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे, मृण्मयी देशपांडे. अभिनेत्री सध्या तिचा आगामी सिनेमा 'मनाचे श्लोक'मुळे चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः मृण्मयी देशपांडे करणार आहे. स्वावलंबी आयुष्य जगणारी मृण्मयी सध्या शेतीसुद्धा करते. काही वर्षांपूर्वीच मृण्मयी महाबळेश्वरला नवऱ्यासोबत शेती करते. आता याच मृण्मयीनं दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याचनिमित्तानं एका पॉडकास्टमध्ये बोलताना मृण्मयीनं पालकत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Continues below advertisement

नुकत्याच 'व्हायफळ' पॉडकास्ट बोलताना मृण्मयीनं आजच्या काळात मुलांना वाढवणं किती कठीण झालं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण किती येते, यावर अत्यंत महत्त्वाचं आणि थेट मत मांडलं आहे. तसेच, मुलाखतीत बोलताना मृण्मयीनं जुन्या आणि नव्या कुटुंब पद्धतीतील फरक स्पष्ट केला. 

मराठी अभिनेत्री पालकत्वाबाबत नेमकं काय म्हणाली?

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाली, "मी माझ्या मित्रमंडळींना पाहिलंय. मुलांना वाढवणं, त्यांच्या एनर्जीला मॅच करणं हे अशक्य आहे... पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. मुलं कुठे आणि कशी वाढायची कळायचंही नाही. कारण आजूबाजूला काकाचं पोर, आत्याचं पोर शेजारी पाजारीच असायचे... ते सगळे एकत्र राहायचे. चाळ संस्कृती होती. पण आता विचार केला तर आज आपल्याला कामही करायचंय, पैसे कमवायचेत, शिक्षणासाठी पैसा हवाय, हे सगळं कसं मॅनेज करायचं..."

Continues below advertisement

"एका फ्लॅटमध्ये राहणारं कुटुंब आहे. नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं. त्यांनाच सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. त्यामुळे ही तारेवरची कसरतच आहे. आजकाल मुलांना मोबाईल देण्यावरुन सगळे शिव्या देतात. अरे पण काय करायचं? आईबापाने हे गणित कसं सोडवायचं. त्यांना दोन मिनिटं कधी मिळणार? मी पूर्णपणे आईबापाला दोष देणार नाही. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाही हे कदाचित त्यांनाही माहितीये पण करणार काय? त्यामुळे ही सगळी गणितं आहेत. यात चूक किंवा बरोबरचं उत्तरच देता येणार नाही.", असं मृण्मयी देशपांडे म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sunita Ahuja On Govinda: 'माझ्या सासरच्या लोकांनाच आम्ही दोघं एकत्र नकोय...'; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा