Sunita Ahuja On Govinda: बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) गेल्या काही वर्षांपासून एकमेकांपासून वेगळं राहत असून त्यांचं वैयक्तिक आयुष्य सध्या जबरदस्त चर्चेत आहे. सध्या हे जोडपं आपलं नातं संपवण्याच्या तयारीत असून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही वारंवार सोशल मीडियावर रंगतात. अशातच गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानं यावर भाष्य केलं आहे. तसेच, घटस्फोटाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सुनीताचं म्हणणं आहे की, "गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा मी ऐकल्यात, पण ज्यावेळी मला ठोस पुरावा मिळेल, त्यावेळी मी स्वतः मीडियासमोर सांगीन."
गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर काय म्हणाली सुनिता अहुजा?
सुनीता आहुजा तिच्या नव्या व्लॉगमध्ये संभावना सेठसोबत दिसली. मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीनं गोविंदाच्या पत्नीला त्याच्या घटस्फोटाबद्दल आणि अभिनेत्याच्या कथित प्रेमसंबंधांबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सुनिता अहुजा म्हणाली की, "मी देखील हे ऐकलंय... आणि मी स्पष्टपणे सांगितलंय की, ज्या दिवशी मला कळेल आणि मला वाटेल की, ची-ची (गोविंदा) मला फसवतोय, तेव्हा मी मीडियासमोर उभी राहून म्हणेन, 'खरंच, तो मला फसवतोय..."
पुढे बोलताना संभावना अहुजा म्हणाली की, "समस्या अशी आहे की, त्याच्या कुटुंबात असे लोक आहेत, जे गोविंदा आणि मला एकत्र पाहू इच्छित नाहीत... गोविंदाच्या कुटुंबातील लोकांना मला आणि गोविंदाला एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यांची मुलं बाळ या जगात नाहीत. ते हाच विचार करतात की यांचं कुटुंब इतकं सुखी आणि आनंदी कसं? कारण त्याची स्वतःची पत्नी आणि मुलं मरण पावली आहेत आणि गोविंदा चांगल्या लोकांशी संगत ठेवत नाही. तुमची संगत वाईट असेल, तर तुम्हीही तसेच होता. माझं फ्रेंड सर्कल नाही... पण, माझी मुलंच, माझे खूप चांगले मित्र आहेत..."
संभावनानं पुढे बोलताना विचारलं की, गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर तुम्हाला थोडीशी तरी शंका आहे? याचं उत्तर देताना सुनिता म्हणाली की, "बघ... शंका घेण्याचा काय प्रश्न? गोविंदा गेल्या 15 वर्षांपासून घराच्या समोर राहतो... पण, तो घरी येत-जात असतो... पण, जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही, तोपर्यंत... जर पुरावा मिळाला, तर मी स्वतः मीडियाला जाऊन सांगेन..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :