Mrunal Thakur : अनेक कलाकारांना ट्रोलर्स त्यांच्या फॅशन आणि फिगरवरून ट्रोल करत असतात. काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora), पलक तिवारी (Palak Tiwari), अनेरी वजानी (Aneri Vajani) या अभिनेत्रींना त्यांच्या फिटनेसमुळे अनेक वेळा ट्रोल करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur) बॉडी शेमिंगबाबत सांगितलं.
मुलाखतीमध्ये मृणालनं सांगितलं, ट्रोलर्स तिची फिगर पाहून तिला 'मटका' असं म्हणत होते. ट्रोलर्स आणि बॉडी शेमिंगबाबत मृणाल म्हणाली, 'ट्रोलर्स माझ्या कर्वी फिगरमुळे मला ट्रोल करत होते. जेव्हा मी वजन कमी करायला सुरूवात करते तेव्हा मी पहिल्यांदा चेहऱ्याचं वजन कमी करते. त्यानंतर शरीराच्या वरच्या भागाचे वजन कमी करते. मग खालच्या भागाचे वजन कमी करते. माझ्या शरीराचा आकार असाच आहे.'
मृणाल पुढे म्हणाली, 'ट्रोलर्समुळे माझ्यातीलआत्मविश्वास कमी झाला होता. पण लोक मला मटका म्हणत होते, या गोष्टीचं मला वाईट वाटतं नव्हतं त्याबद्दल मला अभिमान वाटतो. झिरो फिगर असणं गरजेचं नाहिये. फिट आणि निरोगी राहणं गरजेचं आहे. ' मृणालचा जर्सीचा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील मृणाल आणि शाहिदच्या केमिस्ट्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर