Mrunal Thakur responds to Dhanush marriage rumors: अभिनेत्री मृणाल ठाकूर चित्रपट तसेच वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. गेल्या काही काळापासून मृणाल ठाकूरचं नाव सुपरस्टार धनुषसोबत जोडलं जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगलीये. दोन्ही कलाकारांच्या लग्नाच्याही अफवा सुरु आहेत.  दरम्यान, मध्यंतरी दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दोघेही लग्न मंडपात पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.   मात्र, हा फोटो एआय असल्याचं स्पष्ट झालं.  अलिकडेच मृणालने धनुषसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवांना उत्तर दिले आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांचे तिनं आभार मानले आहे. प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद, असं तिनं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना मृणाल ठाकूरने अफवांना हसून उत्तर दिले आणि म्हणाली, "त्यांच्या हिशोबाने... लग्न तर होत आहे...". यानंतर तिला या अफवांचा तिच्यावर काही परिणाम होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला,   यावर ती म्हणाली, " माझ्याकडे आतापर्यंत पीआर टीम नव्हती.  मला टीम हायर करावी लागली.  कारण माझ्या घराचा पत्ता पब्लिक झाला होता", असं मृणाल म्हणाली.

 

Continues below advertisement

"स्वत:चे रक्षण करण्यासाठी मला एक टीम नियुक्त करावी लागली.  पण मला आता जाणवले की, मी 3 कोटी, 6 कोटी किंवा 10 कोटी जरी खर्च केले असले तरी मला इतकी प्रसिद्धी कधीच मिळाली नसती म्हणून, खोट्या अफवा पसरवणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप आभार", असं अभिनेत्री म्हटलं.  लग्नाबाबत अभिनेत्री म्हणाली, "मी नक्कीच भविष्यात लग्न करेन.  काही घाई नाही. योग्य वेळ आल्यावर मी स्वत: लग्नाची घोषणा करेल", असंही तिनं स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी मृणालने धनुषच्या चित्रपटाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती.  त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली. यानंतर, सन ऑफ सरदार 2 च्या प्रीमिअरमध्ये मृणाल धनुषला भेटली आणि दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले. त्यावेळेस दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दरम्यान, दोघांपैकी कुणीही अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'गाडी थांबवा, रस्ता ओळखीचा नाही'; गजबजलेल्या मुंबईच्या ओसाड रस्त्यावर अभिनेत्रीला घेऊन गेला रिक्षावाला, भयंकर प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला पण...