Rinku Rajguru Opens Up About Love, Breakup: 'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू राजगुरूला रातोरात फेम मिळाली. सैराट या चित्रपटातील 'आर्ची' या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. सैराट या चित्रपटानंतर रिंकूला अनेक चित्रपटातून ऑफर मिळाली. तिनं कायम संधीचं सोनं केलं. रिंकूचा चाहतावर्गही मोठा आहे. चाहत्यांसाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करते. कामाव्यतिरिक्त रिंकू आपल्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. सैराट या चित्रपटानंतर तिचं नाव आकाश ठोसरसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, दोघांमध्ये फ्रेंडशिपव्यतिरिक्त कोणतंही नातं नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनं आपल्या लव्ह लाइफबाबत खुलासा केला आहे. तिनं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान तिला, 'तू कायम सिंगल होतीस की तुझ्या आयुष्यात कुणी आलं होतं?' या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "आवडणं हे एक असतं. कधी तरी कुणीतरी आवडलेलं असतं आपल्याला. हे सगळं आधी होऊन गेलं आहे. आतापर्यंत कुणाबद्दल प्रेम वाटलं नाही, असं नाही. पण आता मी सिंगल आयुष्य जगत आहे. आधी होतं, दरम्यान आता आमचे रस्ते मोकळे झाले आहेत, स्वत:साठी....", असं रिंकूने स्पष्ट केलं.
मुलाकडून अपेक्षा काय? या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "मला जोडीदार हा फॅमिली मॅनसारखा हवा आहे. माझ्या जोडीदाराला कुटुंब महत्त्वाचं असेल, ज्याला माणसाची कदर असेल. महत्त्वाचं म्हणजे, तो फक्त आणि फक्त माझा असावा. बाकी मला काही नको", असं रिंकूने स्पष्ट केलं.
रिंकूसाठी प्रेमाची व्याख्या काय? या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. प्रेम ही जगातील सुंदर गोष्ट आहे. पण का कुणास ठाऊक याच प्रेमाची आता मला भीती वाटते आहे. मला असं वाटतं की, प्रेमात आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतो. आपण त्या माणसावर अवलंबून असतो. आता खरंतर याबद्दल मला भीती वाटते आहे. आजकाल कुणीही कोणत्याही कारणावरून सोडू शकतो. नातं संपुष्टात आणू शकतो. आपल्या आई वडिलांच्या काळात असं नव्हतं. त्यामुळे आता माणसांची आणि प्रेमाची खूप भीती वाटते. मी इमोशनल खूप सेन्सिटिव्ह व्यक्ती आहे. मी प्रेम केलं तर आरपार नाही. नाहीतर मी करत नाही. मला जो मरेपर्यंत, तूच माझी बायको असं म्हणले, त्याच्यासोबत मी राहेन", असं रिंकूने आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केलं.
