Mrunal Dusanis on Wedding Day: मालिकाविश्वात मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. अभिनेत्रीचा चाहतावर्ग (Marathi Actress) खूप मोठा आहे. तिने मालिकेत काम करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' (lagnanantar Hoilch Prem) या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेतील भूमिकेसाठीही तिला प्रेक्षकवर्गाकडून प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मालिकेसह बऱ्याच मराठी सिनेमांमध्येही (Entertainment) झळकली. अभिनेत्री बऱ्याचदा सोशल मीडियातही सक्रीय असते. अनेकदा मृणाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, लग्नातील एक खास किस्सा सांगितला. विवाहसोहळ्यात राष्ट्रगीत वाजलं असल्याचं सांगितलं.
मृणाल दुसानिसने सांगितला लग्नादरम्यानचा एक भन्नाट अन् मजेशीर किस्सा (Mrunal Dusanis Recalls Her Wedding Day)
मृणाल दुसानिस बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शांत, सोज्वळ अशी तिची इमेज आहे. अलिडेच दिलेल्या मुलाखतीत तिने रिलेशनशिप आणि लग्न ठरवताना आणि लग्न होत असतानाच्या गमती जमती सांगितल्या. मृणाल दुसानिसने 'लोकमत फिल्मी' ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मृणालने लग्नादरम्यानचा किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, 'आमचं अरेंज मॅरेज झालं. माझ्या वडिलांच्या ओळखीतील एका काकांनी हे स्थळ सुचवलं होतं. यानंतर त्यांनी फोटो पाठवले'.
'नीरज अन् आम्ही एकमेकांशी बोललो. नंतर आम्ही भेटायचं ठरवलं. सहा महिने आम्ही एकमेकांशी बोललो. अन् लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचं लग्न नाशिकमध्ये झालं. लग्नावेळी बाबांनी मिलिट्री बँड आणला होता. ते छान रेडी होऊन येतात. त्यांचं खूप छान सेटअप असतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण काही वेळानंतर अचानक त्यांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' वाजवलं. सगळे जे नाचत होते, ते थेट उभे राहिले. आपल्याला भारतीय राष्ट्रगीताबद्दल आदर आहेच, पण मला असं झालं की, अरे हे चुकलं का आपल्या लग्नात'..
'मी बाबांकडे बघते, बाबा इकडे तिकडे बघतायेत. जाऊदे आता म्हटलं', असा किस्सा मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना शेअर केला. 2016 साली म्हणजेच 10 वर्षांपूर्वी मृणाल दुसानिसचं नीरज मोरेसोबत लग्न झालं होतं. 2022 साली दोघांच्याही आयुष्यात एका चिमुकलीचं आगमन झालं. दोघांनाही मुलगी झाली. तिच्या लेकीचं नाव नुर्वी असून, लेकीच्या जन्मानंतर तिने पुन्हा मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
