Will Sonakshi Sinha join political party in Future: सीजेपी प्रोटेस्टच्यावेळी सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) व्हिडीओद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला. तिने कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) समर्थनार्थ आपले मत मांडले. तसेच सोनम वांगचुक यांच्या उपोषणालाही पाठिंबा दिला.   या काळात तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तिने मौन बाळगले आहे सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते - राजकारणी  शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी अलिकडेच एबीपी न्यूजशी संवाद साधला.  यावेळी त्यांना  लेक सोनाक्षी सिन्हा राजकारणात प्रवेश करेल की नाही, यावर प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्यांनी  उत्तर दिलं. आपल्या लेकीबद्दल शत्रुघ्न सिन्हा नेमकं काय म्हणाले? (Entertainment) पाहूयात.

Continues below advertisement

एबीपी माझाशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी खुलासा केला की, सोनाक्षीने अलीकडेच झारखंडच्या मुलांना पाठिंबा दिला होता.  यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना, 'सीजेपीच्या आंदोलनादरम्यान तिने खंबीर पाठिंबा दिला होता. या गोष्टी पाहता,  ती राजकारणात प्रवेश करेल, असं तु्म्हाला वाटतं का?',  असा प्रश्न विचारण्यात आला.  या प्रश्नावर उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'मी यावर ठोस असं सांगू नाही शकत.  सुरुवातील मी तिला विचारत देखील होतो', असं शत्रुघ्न सिन्हा  म्हणाले. तसेच म्हणाले की, 'मी हे बोलू शकतो की, ती एक सक्षम वडिलांची एक सक्षम मुलगी आहे', असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सोनाक्षी सिन्हा करण्यात येत असलेल्या ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले? (Will Sonakshi Sinha join political party what shatrugan sinha says)

शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळेस सोनाक्षी सिन्हाला ट्रोल करणाऱ्यांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की,   'बरेच जण जे ट्रोल करतात, खरंतर ते पेड ट्रोलर्स असतात', असं त्यांनी म्हटलं. तसेच  भाजपचे जे आयटी सेल आहे, ते सोनाक्षीच्या विरोधात ट्रोलिंग करतात.  ही एक ट्रोलिंग आहे.  हे पेड ट्रोलर्स आहेत, असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.  दरम्यान, सोनाक्षी सिन्हा राजकारणात प्रवेश करणार का?  यावर  तिचं मत काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, तिला शेवटी आपण सर्वांनी ओटीटीवरील 'सिस्टम' या वेब सिरीज पाहिलं.   ही एक लीगल ड्रामा सिरीज होती. अभिनेत्रीने यात वकिलांची भूमिका साकारली होती.  सोनाक्षीच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबाबत अनाऊसमेंट अजून बाकी आहे.  सोनाक्षी आगामी काळात कोणत्या सिनेमात झळकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?