मालिकेनंतर मृणाल कुलकर्णी यांनी सिनेमांमधूनही जिजाबाईंची भूमिका साकारली. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे आयुष्यात या भूमिकेचं काय स्थान आहे, याविषयीही देखील त्यांनी 'कॉकटेल स्टुडिओ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
कदाचित मी स्वत:ला कधीच कास्ट केलं नसतं - मृणाल कुलकर्णी
मृणाल कुलकर्णी यांनी या भूमिकेविषयी भाष्य करताना म्हटलं की, 'एका भूमिकेने माझ्या मनावर गारुड केलंय आणि ती भूमिका म्हणजे जिजाऊंची भूमिका. नितीन देसाईंनी सगळ्यात पहिल्यांदा या भूमिकेसाठी मला विचारलं. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता आणि तितकच दडपणही आलं होतं. कारण आज जेव्हा एक दिग्दर्शक म्हणून विचार केला आणि मी जर जिजाऊंच्या भूमिकेसाठी कास्टिंग केलं असतं, तर मी स्वत:ला या भूमिकेसाठी कधीच कास्ट केलं नसतं. कारण आपल्या मनात जी जिजाऊंची प्रतिमा आहे ती झुंझार, दणकट अशी येते. पण मी अभिनेत्री म्हणून अर्थातच स्वार्थी आहे, समोर जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा मी त्याला नाही कसं म्हणेन.
पुढे त्यांनी म्हटलं, जेव्हा विचार केला, तेव्हा वाटलं की, स्त्रियांना कणखर म्हटलं जातं तेव्हा ते फक्त शरीरानेच नसतं, तर त्या मानसिकरित्या कणखरही असू शकतात आणि जिजाऊ या मानसिक रित्या कणखर होत्या, हे मी माझ्या मनाशी ठरवलं. त्यानंतर मी खूप वाचन सुरु केलं आणि माझी मी मला त्या भूमिकेत सापडत गेले. आज जेव्हा लोक म्हणतात की,जिजाऊ आईसाहेब म्हटलं की, दुसरं कुणी आमच्या डोळ्यासमोर येत नाही, तेव्हा क्षणभर वाटतं की, जमलं आपल्याला. पण हे मला जमलं वैगरे काही नाही, कारण ती आई खूप महान आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या मनावर अमिठ ठसा उमटवून गेली आहे.
ही बातमी वाचा :
Vijay Kadam Passed Away: ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी