Mithun Chakraboury Career : मिथुन चक्रवर्तींची (Mithun Chakraboury) आज एक वेगळीच ओळख आहे. भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. पण एक काळ असा होता की त्यांना एकवेळच्या जेवणासाठी बड्या लोकांच्या पार्ट्यांमध्ये डान्स करावा लागायचा. या आठवणी त्यांनी कलर्स टीव्हीवरील शो 'हुनरबाज : देश की शान'मध्ये सांगितल्या.
मिथुन चक्रवर्ती हे कलर्स टीव्हीवरील शो 'हुनरबाज : देश की शान'मध्ये जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, "स्ट्रगलच्या दिवसांमध्ये ते मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचे जेणेकरून त्यांना एक वेळचे जेवण मिळावे. जेव्हा आपण मुंबईत आलो तेव्हा आपल्याकडे राहायला जागा नव्हती. वॉचमनने बघू नये म्हणून आपण इमारतीच्या छतावर टाकीच्या मागे लपून झोपायचो."
स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, "कोणीतरी आपल्याला हिरोप्रमाणे कास्ट करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात पैसे वाचवण्यासाठी आपण कामावर चालत जायचो."
मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraboury) यांचा कारकिर्दीचा प्रवास खूप मोठा आहे. त्यांनी डिस्को डान्स, जंग, मर्द, प्यार झुकता नही, प्रेम प्रतिज्ञा अशा बऱ्याच चित्रपटात अभिनय केला. 'जीते है शान से' या चित्रपटातील जुली-जुली हे गाणं तूफान गाजलं होतं आणि या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार
- Samantha : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथाकडून डिलीट; दोघं पुन्हा एकत्र येणार?
- The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha