Milind Soman Mother Skipping Every Day At Age Of 86: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांच्या फिटनेसच्या (Fitness Fanda) चर्चा नेहमीच होत असतात. पण, बॉलिवूडचा (Bollywood News) असा हॅन्डसम हंक, जो साठीला टेकलाय, फक्त त्याच्याच नाहीतर त्याच्यासोबत त्याच्या 86 वर्षांच्या आईच्या फिटनेसच्या चर्चाही रंगतात. आम्ही बोलतोय, प्रसिद्ध मॉडल, फिटनेस फ्रिक मराठमोळा चेहरा असलेला मिलिंद सोमणबाबत (Milind Soman). 


आपल्या जबरदस्त फिटनेससाठी ओळखला जाणारा मिलिंद सोमण त्याच्या फिटनेस फंड्यांमुळे कायम चर्चेत असतो. कधी तो पुशअप्स करताना दिसतो तर कधी मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतो. त्याच्या फिटनेसला अजिबातच तोड नाही. पण, मिलिंद एकटाच नाही बरं का, त्याची पत्नी आणि आईसुद्धा फिटनेस फ्रिक आहेत. मिलिंदची पत्नी अनेकदा मिलिंदसोबत मॅरेथॉनमध्येही धावताना दिसली आहे. तर, त्याची आई उषा सोमण (Usha Soman) सुद्धा कमालीची फिटनेस फ्रिक आहे. याचाच दाखला देणारा आणखी एक व्हिडीओ मिलिंदनं त्याच्या इन्स्टावरुन शेअर केला आहे. 


मिलिंद सोमणने आईचा दोरीच्या उड्या मारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तो लिहितो, "फॅमिली स्किपिंग टाईम. आई आता 86 वर्षांची आहे. तिच्या दररोजच्या अॅक्टिव्हिटीमध्ये योगासोबतच दोरीच्या उड्या मारणंही आहे. सगळ्यांनाच दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो."






मिलिंदनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये साठीला टेकलेला मिलिंद एका पायावर उभा राहून दोरीच्या उड्या मारत आहे. तर त्याच्याच बाजूला त्याची 86 वर्षांची आईसुद्धा झपझप दोरीच्या उड्या मारतेय. आजूबाजूचं वातावरणंही अगदी प्रसन्न करणारं आहे. जिथे मिलिंद आणि त्याची आई दोरीच्या उड्या मारताना दिसतेय, तिथे आजूबाजूचा परिसर धुक्यानं आच्छादलेला आहे. तसेच, मिलिंदनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्याच्याऐवजी त्याची पत्नी म्हणजे, अंकिता कोंवर दोरीच्या उड्या मारताना दिसतेय. सासु-सुन अगदी झपझप दोरीच्या उड्या मारताना दिसतायत. 


बऱ्याचदा उतारवयात अनेकजण अंथरुणाला खिळतात. आरोग्या समस्यांनी ग्रासलेले असतात. पण, 86 वर्षांच्या मिलिंद सोमणची आई याला अपवाद ठरते. या वयातही त्यांचा फिटनेस अगदी विशीतल्या तरुणाला लाजवणारा आहे. मिलिंदनं आईच्या फिटनेस फंड्याचा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मिलिंदनं त्यांचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओ त्या त्यांच्या लेकासोबत मॅरेथॉन पळताना दिसल्या होत्या. तर कधी सूनेसोबत लंगडीही खेळताना दिसलेल्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amitabh Bachchan Love Story: जया, रेखा साऱ्या नंतर, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बिग बींचं 'या' तरुणीसोबत जुळलेलं सूत, लग्नाच्या आणाभाका घेऊनही अधुरीच राहिली लव्हस्टोरी...