मुंबई : म्होरक्या म्हणजे काय? म्होरक्या म्हणजे जो वाट दाखवतो तो. जो नेतृत्व करतो तो. अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्या चित्रपटाने 2018 मध्ये मराठी चित्रपटांचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. आता दोन वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. 24 जानेवारीला रिलीज होणारा चित्रपट पुढे ढकलला गेला आणि त्याची तारीख सात फेब्रुवारी ठरली. याच दिवशी मेकअप, मलंग, शिकारा आदी चित्रपट प्रदर्शित होताहेत. पण या शर्यतीत म्होरक्या मागे पडला आहे. उद्भवलेल्या अडचणी योग्य वेळात सोडवता न आल्याने शुक्रवारी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता शनिवारी प्रदर्शित होणार आहे.


अमर देवकर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. बार्शी आणि परिसरात राहणाऱ्या तरूणांनी हिमतीने हा चित्रपट तयार केला आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सिनेमाबद्द्ल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. परंतु, आता एक नवी अडचण निर्माण झाली. दिग्दर्शक देवकर यांनी फेसबुकवरून आपल्या चित्रपटाला शुक्रवारी एकही शो मिळत नसल्याची माहीती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'व्यवस्थे'ला दोषी धरलं आहे. याबद्दल माझाशी बोलताना दिग्दर्शक देवकर म्हणाले, 'आमचा चित्रपट ऐसपैस यांनी प्रस्तुत करायचं ठरवलं. त्यानुसार सिनेमाची डीसीपी आवश्यक प्रोजेक्टर कंपन्यांकडे दोन ते तीन दिवस आधी पोचणं आवश्यक होतं. ती डीसीपी मिळाल्यानंतर तो सिनेमा अपलोड करता येतो. त्यानंतर तो दाखवला जातो. पण आता प्रस्तुतकर्त्यांनी ही डीसीपी योग्य वेळेत पोचवली नाही. त्यामुळे सिेनेमा अपलोड झाला नाही. आता शुक्रवारी हा सिनेमा अपलोड होईल आणि शनिवारी दिसेल. केवळ नियोजनातल्या हलगर्जीपणामुळे सिनेमाला हा फटका बसला असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.'



आनंद शिंदेंचा नवा अंदाज, म्होरक्या चित्रपटासाठी पहिल्यांदाच गायलं रॅप 

ऐसपैस या बॅनरच्या प्रस्तुतकर्त्यांपैकी एक अभिराम जोशी यांच्याशीही माझाने संपर्क साधला, तर ते म्हणाले, 'सात तारखेपासून आम्ही थिएटर बुकिग्ज केले आहेत. पण आपल्याला थिएटर्सच कमी मिळाली. डीसीपीमध्येही काही तांत्रिक गोष्टींची अडचण होती. त्या सोडवता सोडवता उशीर झाला. आम्ही या गोष्टी लवकर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत होतो. पण ते होऊ शकलं नाही. म्हणून आज सिनेमा थिएटरवर लागला नाहीय. शनिवारपासून सर्व गोष्टी सुरळीत होतील.'

Mhorkya | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक झाला मनोरुग्ण? | ABP Majha