Mere Desh Ki Dharti : सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ओटीटीवरील चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.  चित्रपटांच्या या रंजक प्रवासात प्रेक्षकांची आणि समीक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवणारा दिव्येंदु शर्माचा (Divyendu Sharma) ‘मेरे देश की धरती’ (Mere Desh Ki Dharti) हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर पहाता येणार आहे. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता या चित्रपटाचा आस्वाद ‘अॅमेझॉन प्राइम’ (Amazon Prime) वर घेता येईल. नुकताच हा चित्रपट अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ आला आहे. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे.


वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.


अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर यांनी सांगितले. 'मिर्झापूर' या सीरिजमुळे दिव्येंदु शर्माला विशेष लोकप्रियता मिळाली. 'मिर्झापूर' या सिरीजमधील  दिव्येंदुच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


हेही वाचा: