Mirzapur 3 : 'मिर्झापूर'चे (Mirzapur) आतापर्यंत दोन सीझन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सीझनने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षक आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रसिका दुग्गलने (Rasika Duggal) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


'मिर्झापूर'चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार असल्याने चाहते खूश झाले आहेत. 'मिर्झापूर 3'मध्ये कालीन भैया, गुड्डू पंडित व्यतिरिक्त मुन्ना भैया आणि बीना त्रिपाठी म्हणजेच रसिका दुग्गल दिसून येणार आहे. 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागात काही नवोदित कलाकारदेखील दिसून येणार आहेत.





कालीन भैया आणि गुड्डू 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागात एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहेत. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन नक्की कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राइम व्हिडीओ लवकरच 'मिर्झापूर'च्या रिलीज डेटची घोषणा करणार आहेत. प्रेक्षक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Sher Shivraj : 'शेर शिवराज' प्राइम टाईमला दाखवावा; प्रेक्षकांची मागणी


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ


Heropanti 2 Box Office Collection : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई