मुंबई : राज कुंद्राला अटक होण्याचा मोठा धक्का बॉलिवूडला बसला. शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक असलेला राज कुंद्रा हा नेहमीच चर्चेचा विषय होता. आधी तो शिल्पाचा नवरा म्हणून चर्चेत आला. त्यानंतर ग्लॅमरच्या दुनियेत त्याची चर्चा होती. पण अश्लील फिल्म्स करण्याच्या रॅकेटमध्ये त्याचं नाव आलं आणि खळबळ उडाली. पण नेटकऱ्यांसाठी हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मिडियावर राजवरच्या मिम्सना ऊत आला आहे. 


राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवण्याच्या रॅकेटसाठी पैसे पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. गेल्या फेब्रुवारीपासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. पोलिसांनी पहिली धाड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घातली होती. त्यानंतर मात्र पोलीस तपास करताना राज कुंद्राचं नाव आलं. त्याच्यासोबत त्याचा माजी पीए उमेश कामत, त्याचे नातेवाईक बक्षी यांचीही नावं आली. पण आता राज कुंद्रा नेटकऱ्यांच्या हातचं खेळणं बनला आहे. 





राज कुंद्राला अटक झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करताना दिसतायत. त्यात त्याने कुणाकुणाला कसे मेसेज पाठवले. कुणाला कशी कशी ऑफर दिली गेली याचे सगळे मुद्दे आता  माध्यमांना मिळू लागले आहेत. त्यातून तो पोर्न फिल्म्स तयार करून ओटीटीला देत असे, त्यात हॉटशॉट असंही नाव आलं. गहना वशिष्ठपासून अनेक अभिनेत्रींची नाव यात आली. त्या सगळ्यांनी आपण अश्लील फिल्म करत नसून ती एडल्ट फिल्म करत असल्याचं सांगितलं आहे. पण राज कुंद्रा यांना कोर्ट पुढे शिक्षा करेल वा ना करेल, पण नेटकऱ्यांनी मात्र राज कुंद्रा यांची यथेच्छ टिंगल करायला सुरुवात केली आहे. 






राज कुंद्रा यांचे मिम्स बनवताना अनेक कलाकारांना या मिम्समध्ये सहभागी करून घेण्यात आलं आहे. यात अग्रेसर आहे कपिल शर्माच्या शोमधला व्हिडिओ. कपिलच्या शोमध्ये शिल्पा आणि राज आले असताना, कपिलने राजला प्रश्न केला होता, की राज तू नेहमी शिल्पाबरोबर दिसतोस, विविध क्रिकेट सामन्यात दिसतोस.. पार्टीत दिसतोस.. तुला पैसे मिळतात कसे? हा व्हिडिओ पोस्ट करत, नेटकरी म्हणतात आता याचं उत्तर आम्हाला मिळालं. कपिलने आयुष्यात पहिल्यांदा योग्य प्रश्न राजला विचारलं होता. इतकंच नव्हे, तर या मिम्समध्ये अमिताभ बच्चन, अर्णब गोस्वामी, अमित शाह अशा अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात राज कुंद्राला शिक्षा मिळेल न मिळेल पण नेटकऱ्यांनी मात्र राजची यथेच्छ हुर्यो उडवली आहे. 


राज कुंद्राचं नाव यात आल्यामुळे नाइलाजाने या मिम्समधये शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांना उद्देशूनही काही मिम्स तयार झाले आहेत. एक नक्की की अद्याप या मिम्समध्ये शिल्पा वा तिच्या मुलांना थेट समाविष्ट केलं गेलेलं नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :