Me Too Movement in Malayalam Film Industry : सध्या मल्याळम सिनेसृष्टीत बरीच खळबळ माजत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण बॉलीवुडनंतर आता मल्याळम सिनेसृष्टीतही मी टू ही चळवळ (Me Too Movement in Malayalam Film Industry) सुरु झाली आहे. अनेक अभिनेत्री या त्यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराविषयी भाष्य करत आहेत. त्यातच असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट म्हणजेच AMMA या संघटनेतील काही सदस्यांवरही हे आरोप करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर सिनेसृष्टीतील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. 


या सगळ्या घटनांनंतर असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्टचे अध्यक्ष आणि सुपस्टार मोहनलाल यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे त्यांच्यासह इतर सदस्यांनीही राजीनामा दिला. या सगळ्याची नैतिक जबाबादारी स्वीकारत राजीनामा दिल्याचं सिनेमा असोसिएशनकडून सांगण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा आणखी एक घटना समोर आल्याचं चित्र आहे. 


नेमकं काय घडलं?


मल्याळम सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने तिची ओळख न पटवून देण्याच्या मुद्द्यावर टाईम्स नाऊला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये तिने या सगळ्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की,  मी एका सिनेमासाठी बलात्काराचा सीन शूट करत होते. तो सीन शूट करण्यासाठी मला एका दिग्दर्शकाने जवळपास 17 वेळा रिटेक करायला लावलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की, सर हे तुम्ही चुकीचं करताय. त्यानंतरीही ते मला सारखे रिटेक करायला सांगत होते. 


पुढे तिने म्हटलं की, मी त्यांना म्हटलं की, नेमकी अडचण काय आहे? त्यावर स्पष्टीकरण देत त्यांनी मला म्हटलं की, तुझा आवाज बरोबर येत नाहीये. तेव्हा मी त्यांना म्हटलं, हा सीन तुम्ही दुसऱ्या कलाकारासोबत शूट करा, मी हा सीन करु शकत नाही. त्यानंतर मी तिथून निघाले. पण तेव्हाच सिनेमाच्या निर्मात्याने मला अडवलं.  मी त्यांनाही न जुमण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर माझ्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी मला घेरलं. ते दोघेही असं वागत असताना सेटवरील इतर कलाकारांनीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या बाजूनेही तेव्हा कुणीच उभं राहिलं नाही.  मी त्यांना बाजूला करुन तिथून निसटले आणि त्या दिग्दर्शक, निर्मात्यासोबत मी कधीच काम केलं नाही. 


ही बातमी वाचा : 


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ''वडिलांच्या निधनाने आयुष्यात अंधार...''; 'तारक मेहता...'च्या अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर