मुंबई: मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना भीती वाटली नाही. सिनेमात आणि नाटकात एखादं पात्र रंगवताना जे सुख आनंद मिळतो तो कॅमेर्‍यासमोर मिळत नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते 'सीआयडी' फेम शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघात सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते शिवाजी साटम यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश खांडगे यांचाही शिवाजी साटम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, वैजयंती कुलकणी आदी उपस्थित होते.


भायखळा येथील चाळीतील बाल नाटकातून सुरू झालेला प्रवास, 'एक शून्य शून्य' मराठी गुन्हे मालिका ते आज अनेक चित्रपट, टी.व्ही. मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षांच्या प्रवासातील अनेक किस्से, अनुभव त्यांनी सांगितला. माझी कॅमेर्‍याची पहिली ओळख मुंबई दूरदर्शनवर ज्ञानदीप कार्यक्रमात झाली. त्यावेळी इन्स्पेक्टरची भूमिका करायची होती, पण नेमकं काय करायचं माहित नव्हतं. त्यावेळी दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी केलेल्या भूमिकेची मी जशीच्या तशी कॉपी केली अशी कबुलीही त्यांनी दिली. त्यानंतर 'एक शून्य शून्य' मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे त्यांनी सांगितले.


‘दया कुछ ना कुछ तो गडबड है’ डायलॉग कोणी लिहला?


रंगभूमीवरून आपली अभिनय कारकीर्द सुरू केलेले शिवाजी साटम हे छोट्या पडद्यावरील 'सीआयडी' मालिकेत एसीपी प्रद्मुम्न म्हणून खूप लोकप्रिय ठरले. त्यांचा ‘दया कुछ ना कुछ तो गडबड है’ हा डायलॉग खूप गाजला त्या मालिकेविषयी सांगताना ते म्हणाले की, त्या प्रसंगानुसार तो डायलॉग होता, असे साटम यांनी सांगितले.


कॅमेर्‍यासमोर अभिनय करायचा असतो. अभिनय बदलत नाही पण शिकायला खूप मिळतं. हे शिक्षण आणि शिस्त हे मराठी नाटकांमधून काम करून मिळाली, ही फिक्स डिपॉझीट आहेत. तुमचे डोळे, स्वर बोलला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत राहत हसत खेळत सर्वांनी राहिले पाहिजे. तरच जीवनाचा आनंद घेता येतो, असे सांगत दिग्दर्शक हा चित्रकार असतो कलाकार त्यातील एक रंग असतो त्याला आनंद झाला की मला आनंद होतो, असे अनेक किस्से त्यांनी सांगितले. 


सीआयडी फेम अभिनेत्रीने कुटुंबावर केले गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर करून दाखवल्या शरीरावरील जखमा, नेमकं प्रकरण काय?


‘ध्यानी मनी’ नाटक करताना डिप्रेशन आलं, मी स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं: शिवाजी साटम


‘ध्यानी मनी’ नाटकाचे पात्र रंगवताना जीवनात डिप्रेशन आल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. सुन्न करणारे हे नाटक होते. त्यावेळी मी घरात कोंडून घेतले. घराबाहेर पडायचो नाही. ऑफीसला जायचो नाही. मला काहीतरी होतंय, अशी मनात भीती वाटायची. पण नंतर त्यातून हळूहळू बाहेर पडलो आणि त्या नाटकाचे ४२५ प्रयोग केल्याचे साटम यांनी सांगितले. मराठीतील दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे साटम यांनी सांगितले.


कुरूक्षेत्र या हिंदी चित्रपटात शिवाजी साटम यांनी नेत्याची भूमिका उठवली आहे. मात्र, राजकारणात जाण्याची कोणतीच मनीषा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भायखळा येथील गणेशोत्सव नाटक ठेवली जात असत. लहानपणी अनेक नाटक बघायचो. त्यातूनच हळूहळू नाटकाची आणि अभिनयाची गोडी लागल्याचे साटम यांनी सांगितले. ‘खंडोबाचे लगीन’ या नाटकाच्यावेळी आलेले थरारक अनुभवही त्यांनी कथन केले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे म्हणाले, शिवाजी साटम हे खूप मोठे कलाकार आहेत मात्र त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक जगभर होत आहे.


आणखी वाचा


बँकेत कॅशियर ते सीआयडी; 'रामायण'मालिकेतील 'या' अभिनेत्यामुळे शिवाजी साटम यांचं आयुष्य बदललं