Vaishnavi Dhanraj: अभिनेत्री वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वैष्णवी धनराजनं अनेक हिट टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी आणि तेरे इश्क में घायाल यांसारख्या मालिकांमध्ये तिनं महत्वाची भूमिका साकारली आहे. वैष्णवीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून वैष्णवीनं तिच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.
वैष्णवीनं केले गंभीर आरोप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वैष्णवीने तिच्या चाहत्यांना सांगताना दिसत आहे की, 'हाय, मी वैष्णवी धनराज आहे. मला आत्ता खरोखर मदतीची गरज आहे. मी काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे, माझ्या कुटुंबियांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली. मला मीडिया, न्यूज चॅनेलमधील सर्वांची मदत हवी आहे. कृपया या आणि मला मदत करा'.वैष्णवीच्या या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. त्याच्या ओठावर जखम होती आणि उजव्या हाताच्या मनगटावर जखम दिसत आहे.
आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैष्णवीनं सांगितलं की, "माझा भाऊ, वहिनी आणि माझी आई गेल्या दहा वर्षांपासून मला त्रास देत आहेत. त्यांनी मला मारहाण करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे सातत्याने घडत आले आहे. त्यांना माझे आयुष्य नियंत्रित करायचे आहे, मी कुठे जात आहे, मी कोणाशी बोलत आहे, ते त्यांना जाणून घ्यायचे आहे. मला टॉर्चर कारण्याचे कारण मेरी रोड येथील प्रॉपर्टी आहे. ती त्यांना माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहे."
वैष्णवी आणि नितीनचा झाला घटस्फोट
वैष्णवी शारीरिक हिंसाचाराला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. वैष्णवीने 2016 मध्ये नितीन शेरावतसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत वैष्णवीने सांगितले होता की, कौटुंबिक हिंसाचाराच्या वारंवार घटनांनंतर तिने नितीनला घटस्फोट दिला.
वैष्णवीनं या मालिकांमध्ये केलं काम
वैष्णवीनं अनेक शोमध्ये काम केलं आहे. सीआयडी, बेहद, बेपन्ना, तेरे इश्क में घायाल, नवरंगी रे आणि आपकी नजरों या मालिका आणि शोमुळे वैष्णवीला विशेष लोकप्रियता मिळाली.
संबंधित बातम्या