Ruchira Jadhav On Bikini Trolling: 'माझ्या नवऱ्याची बायको' (Majhya Navaryachi Bayko)  फेम अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) सध्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत झळकतेय. बऱ्याच मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणारी रुचिरा खऱ्या आयुष्यात मात्र फारच बोल्ड आणि ब्युटीफुल आहे. अनेकदा रुचिरानं तिचे बिकनीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण, यामुळेच रुचिराला ट्रोलही करण्यात आलंय. आता रुचिरानं यावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवनं नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते. समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनीमधील फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते. पण लोक या दोन गोष्टी एकत्र का करतात? या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना! माझ्या इस्कॉन मधल्या मंदिराच्या फोटोखाली तुम्ही असं नाही म्हणू शकत की हिचं बाकीचं प्रोफाइल पाहा... ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत. कुठे काय घालायचं हे मला कळतं..."   






"मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालते. खरं तर मी जशी असेल तशी जाते. समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून तिथे जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही. त्यामुळे शूट वरून सुटल्यावर जर मला वाटलं की मंदिरात जायचं आहे तेव्हा मी फक्त नीट प्रेझेंटटेबल कपडे आहेत ना याची दक्षता घेते. जीन्स पॅन्टमध्येसुद्धा मी मंदिरात जाते, डोक्यावर स्कार्फ गुंडाळते. तिथे गेल्यावर माझ्या मनातला भाव माझ्या देवासाठी महत्त्वाचा असतो हे मला माहित आहे. त्यामुळे मंदिरात जाताना मी काय घालायचं काय नाही हे मला कळतं. बीचवर काय घालायचं हे मला माहित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या गोष्टी कृपया मिक्स करू नका", असंही तिने पुढे म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dhanshree Verma Targets Samay Raina: समय रैनानं नाव न घेता डिवचलं; आता धनश्री वर्मानं उत्तर देताना झोड झोड झोडलं