Dhanshree Verma Targets Samay Raina: सुप्रसिद्ध कॉमेडियन समय रैना (Famous Comedian Samay Raina) नुकताच युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) कथित प्रेयसी आरजे महावशसोबत (RJ Mahvash) एका प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रँडच्या कॉमेडी जाहिरातीत दिसला. जाहिरातीत, समयनं युजवेंद्र चहलची घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्मावर (Dhanashree Verma) टीकाही केली. जरी त्यानं थेट धनश्रीचा उल्लेख केला नसला तरीसुद्धा, त्यानं असे अनेक संदर्भ दिलेत, जे धनश्री आणि युजवेंद्रच्या नात्याचे संदर्भ स्पष्ट करतात. तसेच, समयनं धनश्रीच्या 'राईज अँड फॉल' (Rise and Fall) एपिसोडवर टिकाही करतात. 

Continues below advertisement


समय रैनानं धनश्रीच्या 'राईज अँड फॉल विदीन टू मन्थ्स'चा उल्लेख केला. यावरुन समयचा रोख धनश्रीकडे असल्याचं स्पष्ट होतं. 'राईज अँड फॉल'च्या एका एपिसोडमध्ये धनश्रीनं धक्कादायक खुलासा करत युजवेंद्र चहलनं लग्नाच्या दोनच महिन्यांत तिला धोका दिल्याचं म्हटलेलं. धनश्रीनं ही गोष्ट 'राईज अँड फॉल'ची को-कंटेस्टेंट कुब्रा सैतला सांगितलेली. तसेच, समय रैनानं 4.75 कोटी रुपयांची पोटगी आणि युजवेंद्रच्या बी युअर ओन शुगर डॅडी टी-शर्टच्या कॉन्टेस्टवरही भाष्य केलं. खरं तर, समय रैनानं जो टी-शर्ट घातलेला त्यावर 'बी युवर ओन शुगर डॅडी' असं लिहिलेलं.  असाच टी-शर्ट युजवेंद्रनं त्यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान घातला होता. अशातच आता धनश्री वर्मानं समय रैनाला सणसणीत उत्तर दिलं आहे. 






समय रैनावर टीका करताना धनश्री काय म्हणाली? 


धनश्रीनं आपल्या कुत्र्याचा एक गोड फोटो शेअर करत त्यावर लिहिलंय की, "काळजी करू नका मित्रांनो, माझ्या आईचा चांगला काळ (समय) सुरू आहे!" इतकंच नव्हे, तर यावेळी तिनं 'बुरी नजर वाले तेरा मुंह काला' असं लिहिलेला एक स्टिकरही जोडलाय.



धनश्रीनं थेट कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी, तिच्या चाहत्यांनी या पोस्टचा थेट संबंध समय रैनाच्या कार्यक्रमाशी जोडला आहे.