Rajan Teli on Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक (Sindhudurg Bank Scam) केल्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार केल्यानंतर राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, आता राजन तेली यांनी जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा झाला असून त्या कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे (Rajan Teli on Nitesh Rane) असल्याचा त्यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळे तळकोकणात महायुतीत सगळ काही आलबेल असल्याचं दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असून या कर्जवाटपाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी (Rajan Teli Complaint DGP) राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
दबाव टाकून मनमानी पद्धतीने मोठ्या रकमांचे कर्ज वाटप (Nitesh Rane Loan Fraud)
राजन तेली यांनी म्हटलं आहे की, मंत्री नितेश राणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मनमानी पद्धतीने (Illegal Loan Distribution Sindhudurg Bank) मोठ्या रकमांची कर्ज वाटप केली. नाबार्ड, सहकार निबंधक, स्थानिक पोलीस यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेच्या अवैध कर्जवाटपाच्या तक्रारी वारंवार केल्या आहेत. मात्र या प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली, असल्याचं राजन तेली यांनी म्हटलं आहे. कामगारांना आठ कोटी पर्यंतची कर्जे देण्यात आली, बँक कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना अशीच मोठी कर्जे देण्यात आली. राजकीय सूड काढण्यासाठी आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे भू माफियांची चौकशी व्हायला पाहिजे. 900 कोटी सरकार कारखान्यांना दिले, त्यातील काही कारखाने बंद आहेत, त्यांची चौकशीची मागणी राजन तेली यांनी केली.
राजन तेलींचा शिंदे गटात प्रवेश (Rajan Teli Shinde Shiv Sena)
दुसरीकडे, राजन तेली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत (Shinde Sena vs Thackeray Sena Sindhudurg) प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. दीपक केसरकर यांच्याविरोधात राजन तेली निवडणूक रिंगणात होते. केसरकर यांनी राजन तेली यांचा पराभव केला. त्यानंतर राजन तेली राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ते पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार की शिंदे शिवसेनेत जाणार? अशाही चर्चा होत्या. मात्र राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे शिवसेनेला सिंधुदुर्गात धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या