Marathi Actress Ranjana Deshmukh Story: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) 70 आणि 80 चं दशक गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, दिग्गज रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). कधीकाळी अभिनेत्री रंजना (Actress Ranjana) यांच्या सौंदर्यानं साऱ्यांनाच भूरळ घातलेली. त्याव्यतिरिक्त रंजना यांनी आपल्या अप्रतिम अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं केलं. रंजना देशमुख यांचे दादा कोंडके, अशोक सराफ यांच्यासोबतचे अनेक सिनेमे गाजले. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अभिनेत्रीचा अपघात झाला आणि तिचं अख्खं आयुष्य पालटलं. पण, त्यांच्या जिद्दीनं त्या नव्या उमेदीनं पुन्हा रंगभूमीवर आपल्या. पण, दुर्दैवानं अपघातानंतर त्यांनी केलेलं नाटक त्यांच्या कारकीर्दीतलं शेवटचं नाटक ठरलं. 

Continues below advertisement


'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी मराठी सिनेसृष्टीतला एक काळ गाजवणारी दिग्गज गुणी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याबाबत सांगितलं. या मुलखतीदरम्यान त्यांनी रंजना देशमुख यांच्या भीषण अपघाताबाबतही सांगितलं. तसेच, त्यानंतरही त्यांनी केलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या नाटकाबाबतही सांगितलं. 


अपघात झाल्यानंतर 10-12 फुटांवर तिचा हात पडलेला... : अनिता पाध्ये


नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रंजना यांची आठवण सांगत अनिता पाध्ये म्हणाल्या की, "जेव्हा व्ही शांताराम यांचं निधन झालं तेव्हा आम्ही जे ऐकलं होतं ते असं की सिनेमाच्या वेळेला रंजू ताईचा अपघात झालेला. जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा प्रोड्युसर किंवा इतर त्यांची ती जबाबदारी असते. तोपर्यंत तिचे बरेचसे ऑपरेशन्स झाले होते आणि मग शांताराम बापू गेले. त्यानिमित्ताने मी तिची मुलाखत घ्यायला गेले होते. पहिल्याच भेटीत तिचा आणि माझा छान रॅपो जमला. खूप उत्तम अभिनेत्री होती ती. ती जाईपर्यंत तिचं आणि माझं कनेक्शन होतं. ती मला अशोक मामांबद्दल सांगायची. त्यामुळे तिला अशा अवस्थेत बघणं आपल्यासाठी त्रासदायक होतं..."


"तिच्या चेहऱ्याला काही झालं नव्हतं. बाकी शरीर पॅरेलाईज्ड झालेलं. तिचा हात गळालेला. जेव्हा तिचा अपघात झाला तेव्हा जवळपास 10-12 फूट अंतरावर तिचा हात पडला होता. स्वतःचा हात तीच जाऊन घेऊन आलेली, सरकत सरकत जाऊन घेऊन आलेली. पण ती खूप जिद्दी होती. त्यांच्याघरी कॉर्डलेस फोन असायचा जो तिला कानाला लावायला 5 मिनिटं लागायची. मला ती सांगायची मी परत येणार आणि तिने शेवटी एका नाटकात काम केलं.", असं अनिता पाध्ये यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashok Saraf On Marathi Veteran Actress Ranjana: 'रंजना मला फॉलो करायची...'; दिग्गज अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रिन, ऑफस्क्रिन केमिस्ट्रीवर काय म्हणाले अशोक सराफ?