मुंबई : अनेकदा खोटे मेसेज येऊन बँकेतले पैसे चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर येतात. अनेकदा या प्रकाराचे अनेकजण बळी देखील पडतात. असाच एक अनुभव मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले रानडे (Mugdha Gogbole Ranade) यांच्यासोबत घडला आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीचा आपल्याला मेसेज किंवा कॉल येतो आणि बऱ्याचदा घाईत किंवा अजाणतेपणे अनेक जण ह्या प्रकाराला बळी पडतात. असंच काहीसं मुग्धा यांच्या बाततीत घडलं. 


मुग्धा यांनी या सर्व प्रकर त्यांच्या सोशल  मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार मांडला आहे. बऱ्याचदा आपल्याला अज्ञात व्यक्तीचा फोन येतो. ती व्यक्ती आपल्याला सांगते की, तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने  मी पैसे घेतले होते किंवा बँकेतून फोन केल्याचं सांगतिलं जातं, अशी अनेक प्रकारची कारणमिमांसा करत प्रत्येकला कधीतरी असा अनुभव येतो. त्यावेळी योग्य खबरदारी न घेतल्यास आर्थिकदृष्ट्या बराच फटका बसण्याची शक्यता आपल्याला असते. 


मुग्धा गोडबोले - रानडे यांनी काय म्हटलं?


फेसबूक पोस्ट शेअर करत मुग्धा यांनी म्हटलं की,  5 फेब्रुवारी ला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉड चा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अश्यात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंट वर परत जमा करावेत. 12,500 रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं. पुढे त्याने आधी 10,000 रुपये transfer केल्याचा मेसेज आला आणि मग 25000 रुपये पाठवल्याचा मेसेज आला. त्याच वेळी माझ्या gpay अकाऊंट वरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की मी चुकून 2,500 चया ऐवजी 25,000 ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा.  मधल्या काळात मी नवऱ्याशी सम्पर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे ह्या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. 


शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंट चा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे. माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू ह्याचाही कदाचित अंदाज होता. डोळे कान आणि मेंदू 24 तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही.



मुग्धा गोडबोले रानडे ह्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या लेखिकेची धुरा सांभाळली आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांमधून देखील काम केल आहे. 


ही बातमी वाचा : 


'शुटींग सुरु, मज्जा सुरु', सचिन पिळगावकरांनी शेअर केला 'नवरा माझा नवसाचा 2' सेटवरचा धम्माल व्हिडिओ