Marathi Actress Aarti Solanki On Jay Dudhane Hemlata Bane: गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे मराठी मनोरंजन विश्व (Marathi Industry) पुरतं ढवळून निघालं आहे. एका खंडणी प्रकरणात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री (Marathi Actress) हेमलता बाणे (Hemlata Bane) हिला अटक करण्यात आली. तर, त्यापाठोपाठ काहीच दिवसांत नुकताच लग्नबंधनात अडकलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) जय दुधाणेला (Jay Dudhane) हनिमूनसाठी परदेशात जात असतानाच फसवणुकीच्या आरोपाखाली विमानतळावरुन अटक करण्यात आली. दोन्ही कलाकारांच्या अटकेनंतर अख्ख्या मनोरंजन विश्वात खळबळ माजली. अशातच आता हेमलता बाणे आणि जय दुधाणे यांच्या अटकेनंतर मराठी अभिनेत्रीनं संताप व्यक्त करत परखड प्रश्न उपस्थित केला आहे. जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना जशी अटक झाली तशी अटक विजय माल्यासारख्या लोकांना कधी होणार? असा सवाल मराठी अभिनेत्रीनं उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

मराठी अभिनेत्री आरती सोलंकीनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये आरती म्हणाली आहे की, "जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना जशी अटक झाली तशी अटक विजय माल्यासारख्या लोकांना कधी होणार...?" तसेच, आरती सोलंकीनं पोस्ट करताना सोबत कॅप्शनही लिहिलंय. आरतीनं कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना मी सपोर्ट करत नाहीये, पण असे खूप लोक आहेत, ज्यांनी हजारो कोटींची फसवणूक केली आहे, त्यांना अटक कधी होणार?" 

लग्नाच्या अकरा दिवसांत जय दुधाणेला अटक

अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी (Thane Police) मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport) ताब्यात घेतलं. जयवर तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि तो देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, असाही आरोप पोलिसांकडून करण्यात आलाय. पोलीस सध्या त्याच्या कुटुंबाचीही चौकशी करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनावट कागदपत्रांचा वापर करत एकाच दुकानाची वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी जयसोबतच त्याची आई, बहीण आणि आजी-आजोबा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. सध्या ठाणे पोलीस जय दुधाणेची कसून चौकशी करत असून या फसवणूक प्रकरणा मागील नेमका कट, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. 

खंडणी प्रकरणात अभिनेत्री हेमलता बाणे अटकेत 

गोरेगावमधील एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, या प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना हेमलता बाणे हिचं नाव समोर आलंय. या प्रकरणाला मनोरंजनविश्वात विशेष महत्त्व मिळालं कारण हेमलता ही लोकप्रिय मालिका 'आई कुठं काय करते'मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अर्चना पाटकर यांनी अलीकडेच या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेत, हेमलताचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता हे गेल्या चार वर्षांपासून वेगळे असून घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?