Continues below advertisement

Horoscope Today 6 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 6 जानेवारी 2026, आजचा वार मंगळवार आहे. आज 2026 वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा मंगळवारचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली तरी, नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज जेथे काम कराल, तेथील वातावरणात सामंजस्य राहील, महिला करिअरचा विचार जास्त करतील

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज मित्र परिवारामध्ये गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहावे लागेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज तुमचा स्पष्टवक्तेपणा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करेल, तेव्हा बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलताना विचार करा

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज आपल्या बरोबरीचे लोक पुढे जातात, हे समजल्यावर अंतर्मुख होऊन विचार करा

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास वाढेल, चिंतनातून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याकडे कल राहील

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिला ध्येयवादी बनतील, परंतु आपली कुवत लक्षात घेऊन ठोस उद्दिष्ट निश्चित करण्याचा ग्रहांचा संदेश आहे

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणत्याही योजना चिकाटीने प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प कराल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात कोणतेही कार्य मनापासून आनंदाने तांत्रिकदृष्ट्या बरोबर केले, तर कोणताही ताण येणार नाही

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज समस्यांना संधी म्हणून वाटचाल करा, म्हणजे यशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आपल्या करिअरकडे लक्ष देत असताना, प्रकृती स्वास्थ्या कडेही गांभीर्याने बघायला लागेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज गुडघेदुखी, रक्तदाब यासारख्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका, सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहण्यामुळे तोटा होऊ शकतो.

हेही वाचा

Angarak Chaturthi 2026: 6 जानेवारी एक टर्निंग पॉईंट, 3 राशींसाठी नव्या पर्वाची सुरूवात! अंगारकी चतुर्थीला पॉवरफुल दृष्टी योग, बाप्पाच्या कृपेने गूड न्यूज...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)