MCA Election : एमसीए निवडणुकीतील कोर्टात प्रलंबित सभासदांच्या यादीवरील आक्षेप प्रकरणासंदर्भात एकमोठीबातमीसमोरआलीआहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला (Maharashtra Cricket Association Elections) आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीदिलीआहे. निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) यासंदर्भात आदेश दिलेआहे. दरम्यानआज (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालय याबाबत सविस्तर आदेश देणार असल्याचीमाहितीआहे. त्यामुळेआता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांसह (Rohit Pawar) सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) मुलगी रेवती सुळे यांनाहाकोर्टानेमोठा झटका दिल्याचेबोललंजातआहे.
Mumbai High Court: सुप्रिया सुळेंची मुलगी अन् रोहित पवारांची पत्नीसह राजकिय व्यक्तींनी सभासद केल्याचा आरोप
याप्रकरणी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी निवडणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेजने देखील स्वतंत्र याचिका दाखल करुन निवडणुकीला आव्हान दिल आहे. परिणामी, निवडणुकीसाठी नव्याने समावेश केलेल्या मतदारांवर याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच निवडणूक नियमानुसार होत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. नव्याने समावेश केलेले 400 मतदार बाद करून प्रस्तावित मतदार यादी तसेच निवडणूक रद्द करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. तर पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासक नेमण्याची देखील याचिकेत मागणी करण्यात आली आहे. तरदुसरीकडे सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे तसेच रोहित पवारांची पत्नी कुंती पवार यांच्यासह अनेक राजकिय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी सभासद केल्याचा आरोपही याचिकेत करण्यातआलाआहे.
MCA Election : काय आहे प्रकरण?
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी 24 ऑक्टोबरला निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे व अन्य काही जणांनी आक्षेप घेत आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणं न देता त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. तसंच 24 ऑक्टोबरला थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा आरोप करत श्रीपाद हळबे व इतरांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
हे देखील वाचा
