मुंबई : अभिनेते विजय कदम यांचे निधन (Vijay Kadam Death) झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. शेवटी आज (10 ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टी, मालिका, नाटक अशा वेवगेगळ्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव
विजय कदम यांचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत मोठा दबदबा होता. त्यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांतही काम केलेले आहे. विजय कदम चित्रपटात वा नाटकाच्या मंचावर दिसले की प्रेक्षकवर्ग खळखून हसायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी कर्करोगावर मातदेखील केली होती. पण दुर्दैवाने तो पुन्हा उद्भवला होता.
अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार
कदम यांच्यावर नव्याने झालेल्या कर्करोगावर मुंबईतील अंधेरी येथईल एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र शेवटी औषधांचा परिणाम होत नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कदम यांना विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक गंभीर भूमिकादेखील केलेल्या आहेत.
विजय कदम यांची इन्स्टाग्रावर शेवटची पोस्ट
दरम्यान, विजय कदम यांचे इन्स्टाग्राम खाते आहे. त्यांनी इन्स्टाग्रावर 23 डिसेंबर 2023 रोजी शेवटची पोस्ट टाकलेली आहे. ते इन्स्टाग्रामवर फारसे सक्रिय नव्हते. विजय कदम यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या फॉलोअर्सना हसवण्याचा प्रयत्न केला आहे. 'घरी कोणते कॅलेंडर घ्यावे, यासाठी आठवडाभर चर्चा चालू होती. शेवटी काल 'निर्णय' घेतला,' अशी विनोदी टिप्पणी करणारा फोटो त्यांनी शेअर केला होता.
विजय कदम यांची इन्स्टाग्रावरील शेवटची पोस्ट
नाटकं गाजरवली, चित्रपटांतील भूमिका अजरामर
दरम्यान विजय कदम यांनी ऐंशी ते नव्वदच्या दशकात रंगभूमी गाजवली होती. त्यांनी टूरटूर, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा काचे अशा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या नाटकांत काम केलं. त्यांनी ती परत आलिया या मालीकेत साकारलेले पात्र तर खास चर्चेचा विषय ठरले होते. दे दणादण, दे धडक बेधडक, इरसाल कार्टी, तेरे मेरे सपनेमे अशा मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केलं. हळद रुसली कुंकू हसलं या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका विशेष चर्चेची ठरली होती.
हेही वाचा :
Vijay Kadam Passed Away: ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी