मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय आणि दिग्दर्शनानं प्रेक्षकाचं मनोरंजन करणारे दिग्गज कलाकार म्हणजे महेश कोठारे (Mahesh Kothare). महेश कोठारे यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खास क्षणांचा उलगडा गेला आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की, ते दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते आहेत आणि त्यांनी अनेक वेळा थिएटरमध्ये जाऊन दादांचा 'सोंगाड्या' हा चित्रपट पाहिला आहे.


दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र


झी टॉकीजवर दादा कोंडके यांचे चित्रपट सध्या नेमाने दाखवले जात आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या आवडत्या नायकाला तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची संधी मिळत आहे. झी टॉकीज ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना उत्तम चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रेक्षकांच्या आवडणाऱ्या  विनोदी चित्रपटांचे वेळोवेळी  पुनःप्रक्षेपण सुद्धा करते . जुन्या काळातील मराठी सिनेसृष्टीत नावाजलेले अनेक कलाकार हे दादा कोंडके यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्यही लाभले आहे. अशीच एक नावाजलेली व्यक्ती म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे.


महेश कोठारे म्हणाले, "मी दादांचा सर्वात मोठा चाहता"


महेश कोठारे यांनी प्रथम 'प्रीत तुझी माझी' या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते, जे दादा कोंडके यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळेच ‘प्रीत तुझी माझी’ चित्रपटाच्या प्रीमियरला प्रमुख पाहुणे म्हणून दादा कोंडके आले होते. महेश कोठारे आणि दादा कोंडके यांची ही पहिलीच भेट.


दादांकडून महेश कोठारेंच्या कामाचं कौतुक


महेश कोठारे यांना त्यांच्या पाहिल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके आले, याचा खूपच आनंद झाला. अर्थात ते स्वतःला दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते मानतात. दादा कोंडके यांनी सुद्धा प्रीमियरनंतर महेश कोठारे यांचे काम पाहून त्यांची वैयक्तिकरित्या प्रशंसा केली आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.


दादा कोंडके यांचा मोलाचा सल्ला


तेव्हा दादा कोंडके यांनी दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांना एक महत्त्वाचा सल्ला सुद्धा दिला, “चित्रपटाच्या विनोदी दृश्यात कधीही दोन मिनिटांचा वेळ ठेवू नका, कारण हास्याच्या दृश्यांची सातत्यता अत्यंत महत्त्वाची आहे.” हा सल्ला महेश कोठारे यांच्यासाठी सुद्धा खूप मोलाचा ठरला आणि त्यांनी तो त्यांच्या चित्रपटांमध्येही अंमलात आणला.


महेश कोठारे यांना दादा कोंडके यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे . त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके यांच्या उपस्थितीने त्यांना खूप आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी त्यांच्या करियरमध्ये या सल्ल्याचा फायदाही करून घेतला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


John Abraham : पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर भडकला जॉन अब्राहम; म्हणाला, 'मी कधीही मृत्यू विकू शकत नाही'