Thalapathy Vijay Vs Dhanush: अभिनेता धनुषच्या तामिळनाडूच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल चर्चा चांगलीच रंगली आहे. मुख्यमंत्री विजय यांचे ज्योतिषी, रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांनी दावा केला आहे की, 2031 च्या निवडणुकीत विजय आणि धनुष यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. धनुषने अद्याप राजकारणावर भाष्य केलेले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या एका चित्रपट कार्यक्रमात त्याने हजारो चाहत्यांना सांगितले की, ही एकता केवळ चित्रपट कार्यक्रमांपुरती मर्यादित राहू नये. त्यांनी आपापल्या भागातील लोकांची सेवा केली पाहिजे.

धनुषने गरिबांना मोफत ऑटो-रिक्षांचे वाटप केले 

आपल्या 43 व्या वाढदिवसानिमित्त, धनुषने गरिबांना मोफत ऑटो-रिक्षांचे वाटप केले आणि सुमारे 30 लोकांना रोजगारासाठी आर्थिक मदत दिली. धनुषच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, तो राज्यव्यापी दौऱ्याची योजना आखत आहे, जिथे तो चाहत्यांना भेटेल आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून लोकांशी जोडला जाईल.

एमजीआर, राजकारणात येण्यासाठी प्रेरणा 

विश्लेषक आर. रंगराज म्हणतात की, एमजीआर यांनी एकेकाळी चित्रपट कलाकारांच्या संपूर्ण पिढीला राजकारणात येण्यासाठी प्रेरणा दिली होती. आता, विजय यांनी आपल्या लोकप्रियतेचे राजकीय शक्तीमध्ये रूपांतर केले आहे. अशा परिस्थितीत, भविष्यात धनुष, सूर्या आणि विशाल यांच्यासारखे अभिनेतेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. यामुळे डीएमके-एडीएमके पक्ष बाजूला पडू शकतो. दुसरीकडे, धनुषच्या फॅन क्लबने एक ध्वज प्रसिद्ध केला आहे. त्यावर पांढरा आणि लाल रंगाचा तारा असून मध्यभागी धनुषचा फोटो आहे. मात्र, फॅन क्लबचे अध्यक्ष सुब्रमण्यम शिवा यांच्या म्हणण्यानुसार, ते हा ध्वज 15 वर्षांपासून वापरत आहेत. तथापि, तज्ज्ञांच्या मते, विजयप्रमाणेच संघटित फॅन क्लब आणि समाजकल्याण कार्य हे रणनीतीचाच एक भाग आहे.

विजय यांच्या टीव्हीकेची सत्ता

यंदा झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत राजकीय पंडितांचे सर्व अंदाज फोल ठरवत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. बहुमताचा बेगमी करण्यासाठी काँग्रेसने आपल्या पारपंरिक मित्र असलेल्या डीएमकेची सुद्धा साथ सोडल्याने राजकीय खळबळ उडाली. विजय यांच्या काँग्रसेच्या मदतीने तसेच छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केलं. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 234 पैकी 107 जागा जिंकल्या. डीएमके अवघ्या 59 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या पाच जागा टीव्हीकेसाठी निर्णायक ठरल्या.  

इतर महत्वाच्या बातम्या