Vaastav Fame Marathi Actor Sanjay Narvekar: जंतर मंतरवर (Jantar Mantar) एल्गार पुकारत युवकांची तोफ संसद भवनाबाहेर धडाडली. 20 जुलै रोजी भव्य आंदोलन पार पडले. या आंदोलनात केवळ भारतातील नागरिक नसून, परदेशातील दिल्लीत उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा (CJP Protest) दिला. जेन झींच्या आंदोलनाने संपूर्ण देशाला दणाणून सोडले.  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आंदोळनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केलं. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाली.  पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

Continues below advertisement

संजय नार्वेकर यांचा संताप अनावर, सीजेपी आंदोलनावर संजय नार्वेकर काय म्हणाले? (Vaastav Fame Marathi Actor Sanjay Narvekar on CJP Protest)

पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर सिनेसृष्टीतील काही सिने कलाकारांनी आवाज उठवला. तसेच या वागणुकीचा निषेध नोंदवला. अलिकडेच सलमान खानने या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती.  या पोस्टद्वारे त्याने पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्यास आवाहन केले होते.  बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. अतुल कुलकर्णी यांच्यानंतर अभिनेता संजय नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

आंदोलनात मुलांवर झालेल्या लाठीचार्जनंतर अभिनेता संजय नार्वेकर यांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला आहे. संजय नार्वेकर म्हणाले, 'इतके दिवस शांतेत सगळं सुरू होतं. मग गुंडागर्दी कशी सुरू झाली? कुणीतरी बाहेरहून येऊन हे सगळं करत असेल ना? इतके दिवस जंतर मंतरवर काही झालं का? वाद, मारामारी, कुणाचं भांडण झालं का? कुणी शिवीगाळ केली का? नाही... अचानक परवापासून या गोष्टी का होऊ लागल्या?', असा सवाल संजय नार्वेकर यांनी उपस्थित केला.

Continues below advertisement

'यामागे सगळं राजकारण आहे, हे आम्हाला ठाऊक आहे आणि तुम्हालाही ठाऊक आहे.  सर्वांना ठाऊक आहे. मुलांना मारलात तर त्यांचे पालक भडकतील.  जर त्यांचे पालक भडकलेत तर काहीही  होऊ शकतं. संपूर्ण ताकद मुलांच्या बाजूने आहे.   त्यांना समजवा तुम्ही देखील समजून घ्या, चांगलं काहीतरी करा', असं संजय नार्वेकर म्हणाले.    सध्या संजय नार्वेकर यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'