Nashik Rain: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून मोठा पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू असल्याने गोदावरी नदीला (Godavari River) पूर आला आहे. विशेषतः नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandur Madhameshwar Dam) तब्बल 71 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे.

Continues below advertisement

Nandur Madhyameshwar Dam: अनेक गावांत शिरले पाणी; पिकांचे अतोनात नुकसान

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि नदीकाठच्या चांदोरी, सायखेडा, कोठुरे, करंजगाव, चापडगाव आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यात प्रामुख्याने ऊस, सोयाबीन आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुराची परिस्थिती लक्षात घेता, बाधित होणाऱ्या किंवा विस्थापित होण्याच्या मार्गावर असलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद प्रशासनाने सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित केले आहे. बाधितांना सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे.

Gangapur Dam: गंगापूर धरणातील विसर्ग घटला 

नाशिक शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार कायम असली, तरी गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. सध्या गंगापूरमधून 12,680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरचा विसर्ग घटल्याने धोक्याची पातळी ओलांडलेल्या नाशिक शहरातील गोदावरी नदीची पाणीपातळी काही प्रमाणात खाली आली आहे, ज्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Continues below advertisement

Nashik Rain: जिल्ह्यातील 11 धरणांतून विसर्ग सुरू 

नांदूरमध्यमेश्वर धरण: 71,000 क्युसेक

दारणा धरण: 19,312 क्युसेक

गंगापूर धरण: 12,680 क्युसेक

याशिवाय कडवा, भावली, भाम, पालखेड, पुणेगाव, गौतमी गोदावरी, वालदेवी आणि भोजापूर या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Nashik Rain: प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या आणि पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी विनाकारण नदीपात्र, पूल किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत