Salman Khan Flaunts Six-Pack Abs: कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) समर्थनार्थ तसेच नीट पेपरफुटी प्रकरणावरुन सध्या युवा आंदोलकांनी रान उठवलं आहे. केवळ वैद्यकीय नसून, प्रत्येक क्षेत्रातील मुलं या आंदोलनात सहभागी झाले आहेत.  या युवा आंदोलकांच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी पुढाकार घेत या आंदोलनाला पाठिंबा (CJP Protest) दिला. विशेष बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या अधिकृत अकाऊंटवर (Salman Khan) पोस्ट केल्या आहेत. त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली होती.  तसेच आंदोलकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी आवाहन केलं होतं (Entertainment). तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.  

Continues below advertisement

सलमान खानच्या इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष (Salman Khan Instagram post goes viral)

काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडओवरुन सलमान खानची तब्येत बिघडली असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, अलिकडेच भाईजानने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या जुन्या स्टाइलमध्ये फोटो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सलमान खान जिम क्लबमध्ये असून, त्याचे सिक्स पॅक अॅब्स दिसत आहे. तसेच त्याच्या डोक्यावर जिमचा पांढऱ्या रंगाचा टॉवेल दिसत आहे.  या फोटोमध्ये सलमान खानची बॉडी फिट दिसत आहे.

आपली बॉडी दाखवत सलमान खानने फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोला जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की,    'सलमान खान डर गया...हम्म्म्म... जो डर गया वो मर गया', असा हटके कॅप्शन त्याने फोटोला दिला आहे.   सलमान खानची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करुन सलमान खानचं कौतुक केलं आहे.  

एका युझरने आपल्या सलमान खानच्या  पोस्टवर म्हटलं की, 'सलमान भाऊ, तुम्हाला  काही तोड नाही'. तर आणखी एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं की, 'सलमान भाऊ तुम्ही तर आमचे  सिंह आहात.   10000 कुत्रे तर अशीच भूंकत राहतील'.   दुसऱ्या एका युझरने,  'सलमान भाऊ सांभाळून, तुमची ही पोस्ट पाहून बरेच जण घाबरले आहेत', अशी कमेंट केली आहे.   अनेक नेटकरी आणि चाहत्यांनी सलमान खानच्या बॉडीचेही कौतुक केलं आहे. सध्या सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO