Atul Kulkarni : मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गद अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवलेला आहे. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी भरीव आणि उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांचा साहित्य क्षेत्रातील व्यासंगही प्रचंड मोठा आहे. ते सध्याच्या साहित्यिक, राजकीय परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य करत असतात. सध्या ते एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एक कविता लिहिली आहे. हीच कविता सध्या चर्चेत आहेत.
अतुल कुलकर्णी यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांनी या कवितेत राजकारण, मतदान, लोकांची मानसिकता यावर बोट ठेवलं आहे. राजकारणी लोक सामान्य मतदारांचा फायदा कसे घेतात, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी अतुल कुलकर्णी यांनी केला आहे.
अतुल कुलकर्णींची नेमकी कविता काय आहे?
लोक-मताची डुबकी
मतं गर्दी करतात...मतं डुबकी घेतातलोक चिरडले जातात लोकांची प्रेतं बनतात लोक रडतात भेकतात लोक शांsssत होतात
पाच वर्षं सरतात बारा वर्ष सरतातपरत, मतं गर्दी करतात मतं डुबकी घेतात
लोक चिरडले जातात लोकांची प्रेतं बनतात लोक रडतात भेकतात लोक शांsssत होतात, परत...
मतं मनोरे रचतात मतं जल्लोष करतात
लोक कोसळून पडतात लोक घायाळ होतात लोक रडतात भेकतात लोक शांsssत होतात
पाच वर्षं सरतात बारा महिने सरतात
परत, मतं मनोरे रचतात मतं जल्लोष करतातलोक कोसळून पडतात लोक घायाळ होतात लोक रडतात भेकतात लोक शांsssत होतात, परत...
मतं रक्तं सांडतात लोक शांत राहतातलोक भक्तं असतात लोक मतं 'बनतात' मतं अंधळी होतात लोक ठेचा खातातमतं रक्तं सांडतात लोक शांत राहतात, परत...
हेही वाचा :
Khushi Kapoor: श्रीदेवीच्या लाडक्या लेकीचं नवं फोटोशूट; पांढऱ्या स्कर्टमध्ये दिसतेय ग्लॅमरस!