Nandurbar Hit and Run: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून एक अपघाताची (Accident) मोठी बातमी समोर आली आहे. यात हिट अँड रनचा (Hit and Run) प्रकार घडला असून या भीषण अपघात रस्त्यावर पायी चालणाऱ्या आईसह मुलाला भरधाव वाहने चिरडले आहे. यात भरधाव फ़ॉर्च्यूनर कारने आई आणि मुलांचा जीव घेतला असून या घटनेने शहरात सावत्र एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात 22 वर्षीय मुलासह 54 वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार चालक विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा (Nandurbar Crime) दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे नंदूरबार शहरात एकच खळबळ उडाली आहे.


हिट अँड रनच्या घटनेत माय-लेकाचा दुर्दैवी अंत


पुढे आलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्यूनर गाडी जात होती. तर दुसरीकडे याच रस्त्यावरून द्वारकाधीशनगर मध्ये राहणारे कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, यातील भरधाव वाहनाने पायी चालत असलेल्या आई व लेकाला जोरात धडक मारून चिरडले. ही घटना 17 फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रशासनाचा गलथान कारभार, स्थानिकांच्या संताप 


महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत बांधकाम विभागाला पंधरा दिवसांपूर्वीच नागरिकांनी गतिरोधक बसवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. परिणामी प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथान कारभारामुळे आई व मुलाला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. 



समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 24 तासातली दुसरी घटना  


समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात हा सलग दुसरा मोठा अपघात आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या 24 तासात दुसरा मोठा  खाजगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याने समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे.  पुण्यावरून रायपूरला जाणाऱ्या हंस ट्रॅव्हल्सचा कारंजा इन्टरचेंज टोल प्लाझा जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती कळते आहे. रस्त्याच्यामध्यभागी असलेल्या खड्य्यात बस उतरल्याची माहिती प्राप्त होतेय. मात्र अपघाताच कारण नेमकं काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुसरीकडे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amravati News : बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा