Chhava Movie Screening: विक्की कौशल (Vicky Kaushal)- रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या राजाची शौर्यगाथा पाहून चाहते पुरते भारावून गेले आहेत. अशातच आता गुजरातच्या भरूचमधून एक बातमी समोर येत आहे. 'छावा' सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये छत्रपती शंभू राजांवर मुघल बादशाह औरंगजेबानं केलेले अत्याचार पाहून एक प्रेक्षक नाराज झाला. त्यानं मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि थेट थिएटरची स्क्रिन फाडायला सुरुवात केली. संतापलेल्या प्रेक्षकानं सिनेमा सुरू असतानाच स्क्रिन फाडायला सुरुवात केली.
संतापलेल्या एकानं तोडली थिएटरची स्क्रिन
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार भरूचमधील प्रेक्षक जयेश वसावा सहन करू शकला नाही. रागाच्या भरात त्यानं स्क्रीन तोडली. मराठा-मुघल संघर्षावर आधारित या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन दरम्यान भरूचमधील एका चित्रपटगृहात ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी गुजरात पोलिसांनी आरोपी जयेश वसावाला अटक केली आहे.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या चित्रपटातील एका गाण्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर चित्रपटातून गाणं काढून टाकण्यात आलं. पण, अखेर चित्रपटाला लागलेली वादाची किनार दूर झाली आमि चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त तीनच दिवसांत चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटानं 145 कोटी रुपयांची कमाई केली.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेता अक्षय खन्नानं मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. भव्य सेट्स, दमदार डायलॉग्स आणि गुणी कलाकारांसह 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :