Manoj Jarange Patil Maratha Reservation :   मराठा  समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) निर्णायक लढा उभारणारे  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ''संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अजय गोगावले यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेले उधळीन मी... हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. 'वचनाची राखतो आब...हा मर्दमावळा शिवरायांचा वाघ' हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आले आहे. दिव्य कुमार  यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे. 


मर्दमावळा या गाण्याला वीरश्री चेतवणारे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, भारदस्त आवाज लाभलाय. दिव्यकुमार यांनी हे गाणं गायलं आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम, आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद, त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखविण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच "मर्दमावळा" हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चित्रपटातून समाजासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


चित्रपटात कलाकारांची मांदियाळी...


सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.




इतर महत्त्वाच्या बातम्या :