Dharmendra Prayer Meet, Hema Malini: बॉलिवूडवर (Bollywood News) तब्बल सहा दशकं राज्य करणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन झालं आणि अवघी सिनेसृष्टीत शोकसागरात बुडाली. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांचं निधन झालं आणि 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबानं त्यांच्यासाठी प्रार्थना सभा (Dharmendra Prayer Meet) आयोजित केलेली.  धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा इतक्या घाईघाईनं काढण्यात आलेली की, बरेच लोक उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रार्थना सभेला मात्र त्यांचे सहकलाकार, इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची गर्दी जमलेली पाहायला मिळालं. पण, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही लेकी उपस्थित नव्हत्या. यावर बरीच चर्चा झाली. अशातच आता देओल कुटुंबीयांनी (Deol Family) आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हजेरी लावलेले सुप्रसिद्ध निर्माते मनोज देसाई (Producer Manoj Desai) यांनी आता हेमा मालिनींबाबत (Hema Malini) एक वक्तव्य केलंय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

Continues below advertisement

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी एका प्रार्थना सभेचे आयोजन केलेलं. पण, देओल कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या प्रार्थना सभेसाठी हेमा मालिनी मात्र उपस्थित राहू शकल्या नाहीत. आता यावर निर्माते मनोज देसाई यांनी भाष्य केलं आहे. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेसाठी उपस्थित राहिल्या नाहीत, हे बरं झालं असं ते म्हणाले आहेत. 

धर्मेंद्रंच्या प्रार्थना सभेला शेकडो लोकांच्या रांगेत उभा होतो : मनोज देसाई 

विकी लालवानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मनोज देसाई यांनी स्पष्ट केलं की, ते धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला शेकडो लोकांच्या रांगेत उभे होते आणि सनी देओलला भेटण्यासाठी त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. तो म्हणाले की, "गाड्यांची खूप मोठ्ठी लांब रांग होती. माझी गाडी 86 क्रमांकावर उभी होती. माझ्या पुढे आणि मागे मोठ्या गाड्या होत्या. प्रार्थना सभेत भजनं गायली जात होती आणि असं वाटत होतं की, सगळं जग तिथेच आलंय... सर्वजण प्रार्थना सभेला आले होते. मी सनी देओलला भेटलो आणि त्याला सांगितलं की, खूप लोक येत आहेत, म्हणून मी समोरच्या गेटमधून जाईन... तो म्हणाला, "आल्याबद्दल धन्यवाद... बाहेर रांग इतकी लांब होती की, मला माझ्या गाडीसाठी सुमारे 45 मिनिटं वाट पहावी लागली..."

Continues below advertisement

निर्माते मनोज देसाईंनी सांगितलं की, मी कोणत्याही कलाकाराच्या प्रार्थना सभेसाठी एवढी गर्दी पाहिली नाही, जेवढी धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला झालेली. ते म्हणाले की, "मी अनेक कलाकारांच्या प्रार्थना सभेसाठी गेलोय. ज्यात अगदी सुपरस्टार राजेश खन्ना यांचाही समावेश होता, जिथे मी बिग बी अमिताब बच्चन यांच्या शेजारी बसलेलो... मी यश चोप्रांच्याही प्रार्थना सभेला उपस्थित राहिलो आहे, पण धरमजींच्या प्रार्थना सभेसारखी गर्दी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. असं वाटलं की, संपूर्ण देश तिथेच आलाय. एकही व्यक्ती अशी नव्हती जी येऊ इच्छित नसेल..."

हेमा मालिनी यांनी देओल कुटुंबापासून वेगळी, त्यांच्या घरी धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबईत त्यांच्यासाठी वेगळी प्रार्थना सभा का आयोजित केली? त्या सनी देओल आणि त्यांच्या कुटुंबानं आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला का उपस्थित राहिल्या नाही? यावर मनोज देसाई यांनी आता भाष्य केलं आहे.

...म्हणून हेमा मालिनींनी वेगळी प्रार्थना सभा आयोजित केलेली : मनोज देसाई

हेमा मालिंनीबद्दल बोलताना मनोज देसाई म्हणाले की, "हेमाजी उपस्थित न राहिल्याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही... कोणतीही चर्चा किंवा वाद निर्माण होण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी प्रार्थना सभा आयोजित केली. त्या उपस्थित न राहणं हे चांगलंच होतं. हेमाजी आणि धर्मेंद्रजी खूप जवळचे होते, पण जर कोणी काही बोललं असतं तर संपूर्ण प्रार्थना सभेचं वातावरण बिघडू शकलं असतं. म्हणूनच, वेगळी प्रार्थना सभा आयोजित करणं हा हेमा मालिनींचा निर्णय योग्य होता..."

दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबीयांची प्रार्थना सभा झाल्यानंतर हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींनी 11 डिसेंबर रोजी दिल्लीत एक प्रार्थना सभा ठेवली होती. ज्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dahmendra : सनी-बॉबी देओल नाही तर या अभिनेत्याला मुलगा मानत होते धर्मेंद्र; म्हणाले, माझ्यावर गेलाय...